प्रेम गीत
दरवडला हा गंध फुलाचा
रंग साजरा इंद्र धनुचा
भुल मनाला अलगद पडली
नाती गोती सारि विसरली
प्रितीत तुझ्या बावरले रे
गोंधळले रे गोंधळले रे ...
मन् हे माझे असे सोहळे
हरवुन जाते तुझ्यात वेडे
ओढ लागली तुझी मनाला
प्रीत न कळली सखे कुणाला
प्रितीत तुझ्या बावरलो रे
गोंधळलो रे गोंधळलो रे...
सख्या साजना मला कळु दे
प्रीत तुझी रे मला वळू दे
मनी मोर तो असा नाचरा
शब्दात माझीया भाव लाजरा
प्रितीत तुझ्या बावरले रे
गोंधळले रे गोंधळले रे ...
वेडा झालो प्रेमात साजने
मन् हे माझे निखळ चांदणे
आभास असा होई मनाला
वेडेपण हे सांगु कुणाला
प्रितीत तुझ्या बावरलो रे
गोंधळलो रे गोंधळलो रे ...
©शिवा चौधरी(कळमसरेकर)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें