आरोळी
माझे शब्द तुला घे, तुझं शब्दधन मला दे.
माझी साठवण तुला घे, तुझी आठवण मला दे.
माझा वसंत तुला घे, तुझी पानगळ मला दे.
माझा उत्साह तुला घे, तुझी मरगळ मला दे.
माझा मोहर तुला घे, त्याचं फळ मला दे.
माझी मेहनत तुला घे, फक्त बळ मला दे.
माझं मन् तुला घे, तुझ विमन मला दे.
माझे प्राण तुला घे, तुझं जीवन मला दे.
माझं सुख तुला घे, तुझं दुख मला दे.
माझी तृप्ति तुला घे, तुझी भुक मला दे.
माझा हर्ष तुला घे, तुझा स्पर्श मला दे.
माझी खोडी तुला घे, तुझा आदर्श मला दे.
माझे नेत्र तुला घे, तुझे स्वप्न मला दे.
माझी मौज तुला घे, तुझे विघ्न मला दे.
माझे रंग तुला घे, तुझे चित्र मला दे.
माझे फुल तुला घे, तुझे इत्र मला दे.
माझं यश तुला घे, तुझे प्रयत्न मला दे.
माझा उल्हास तुला घे, तुझ्या यातना मला दे.
माझी कुरघोडी तुला घे, तुझी गोडी मला दे.
मी राहील सदा तत्पर, तु फक्त आरोळी दे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें