सोमवार, 7 सितंबर 2015

गुरु महीमा अभंग

गुरु

आजचा दिवस
गुरुमय झाला
महीमा दावला
पौर्णिमेचा

गुरू असे माझे
आई बाप दोन
नाही जगी ज्ञान
गुरु विन

गुरूचा महीमा
वर्णावा हो किती
गुरु विन मती
अपुरीच

गुरु माझे सन्
गुरु माझे पर्व
गुरुविन सर्व
व्यर्थ जाये

तुकोबाचा गुण
माझ्या अंगी यावा
जन्म सार्थ व्हावा
पौर्णिमेला

शिवा म्हणे माझे
फिटु दे रे पांग
मार्ग मला सांग
मुक्ती साठी

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर, जळगांव
🚩💐🚩💐🚩💐🚩𱀽𴀽򺐽

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें