शुक्रवार, 11 सितंबर 2015

पोळा(पोया)

पोया

आज सन् बैल पोया
आसु सुखला रे डोया
मया सर्जाराज्या भोया
त्यांची सुखले रे काया

सारं वरीस रे बैल
राबराबतो शेतात
गुपगमान चालतो
बैल उभ्या रे पिकात

बिन मुसक्याचं त्यानं
नही शिवलं पिकाले
ही इमानदारी त्याची
ठावं सारि रे जगाले

कधी केली ना तक्रार
दिलं तितकच खाये
जरी नसलं वैरण
भार खांद्यावर वाहे

आज पुरणाची पोयी
द्याया पाहीजे रे तुले
यश नही आलं यंदा
चारआनं कमव्याले

नही नवा गोंडा तुले
नही गयामंधी गेठा
नही शिंगाले शिंदुर
जरी सन् तुया मोठा

यंदा नही रे पिकलं
दायदाना नी जोंधळं
कसं घेऊ बायकोले
नवं कोरं रे लुगडं

नही पोऱ्याले कपडे
नही माती बैलजोडी
आज पोयासाठी नही
खिशामंधी रे दमडी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें