बुधवार, 9 सितंबर 2015

हुंदका

हुंदका

ऐनं तारुण्यात सखे गांव गं सोडलं,
हिंडाव तुज संग तवा नातं सीमेसी जोडलं,

तुया आठवणीत जीव होई कासाविस,
तुया विन सखे कसे काढु गं हे दीस,

दिस जातो गं निगुन रात सरता ना सरे,
राती डोया पुढं मये केविलवाणे गं लेकरे,

मया लेकरांन सखे काय केलय गं पाप,
जिता असुन बि संगे राहीना हा बाप,

सांगता सैनिकांची व्यथा डोया अश्रु गं आटती,
उरि हुंदके दाटती उरि हुंदके दाटती.

       © शिवा चौधरी
       जामनेर, जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें