नटरंगी नार
अशी झाली नवलाई, मनी फुटते गं लाही
माझ्या लगनाची घाई, का गं करते गं आई
आई आज गं बोलली, मनी चाहुल लागली
हौस डोळ्यांची फिटली, मज नार गं भेटली
अशी नटरंगी नार, तीची चोळी भरजारं
अंगी यौवनाची धारं, करि नजरेनं वारं
नजरेच्या खाणाखुणा, छेद करते गं मना
अशी सुंदर ललना, देह तुझा गं तरणा
गोडं तुझी देह बोली, खळी नाजुक गं गाली
अंगी पैठणी नेसली, नाक मुरडत आली
नाक तुझं चाफेकळी, ओठं मोसंबीची फोडी
चाखु का गं मी ही थोडी, मला आंबटाची गोडी
गोडी लागली गं तुझी, राणि होशिल का? माझी
तुला मिरवीन जगी, सखे हो ना गं तु राजी
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें