शनिवार, 12 सितंबर 2015

दोन अभंग

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
             अभंग

टाळ नी चिपळ्या
करती गजर
मायेचा पाझर
आई रुख्मीणीचा

मृदुंगाच्या संगे
विण्याचा तो ध्वनी
भाव असा मनी
तरंगु दे माझ्या

ऐकुन तो ध्वनी
विठ्ठल धावला
मनाला भावला
अभंग हा देवा

भेटतो जयाशी
अभंगाचा संग
जीवनाचा रंग
फुले आपोआप

पाऊस होऊन
भक्तासाठी धावं
भक्ताला तु पावं
देवा पांडुरंगा

कर्माचेच फळ
मिळु दे सुंदर
बनु दे मधुर
बोलचाल माझी

तुच माझा बाप
तुच माझीआई
कसं उतराई
होऊ देवा

2.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
                अभंग

दिंडी आज आली
तुझीया पायाशी
तारावे भक्तासी
एकादशी दिनी

पांडुरंगा ठाई
करतो नमन
म्हणतो भजन
विठ्ठलाच्या दारी

आज एकादशी
आषाढाची देवा
आशिर्वाद द्यावा
तुझीया भक्तासी

दंग झाले पहा
आज वारकरी
चंद्रभागे तिरी
नाचुनीया सारे

गजर करुया
विठ्ठल नामाचा
अभंग शिवाचा
घेऊन जोडीला

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें