सोमवार, 7 सितंबर 2015

कविता आठवणी

::::::::::: आठवणी :::::::::::::

मज असे वाटे तु आठवां सारखे व्हावे
आठवां सारखे तु ही वारंवार यावे
आसुसलोय गं मी तुझ्या प्रेमासाठी सखे
येऊन तु भरभरुन प्रेम मज द्यावे

क्षणाक्षणाला असते नेहमी तुझी आस
तुच माझं स्पंदन अन् तुच माझा श्वास
दचकतोच मी चाहुल लागता कुणाची
दाही दिशी फक्त आणि फक्त तुझेच भास

प्राजक्ताच्या फुलावाणी मोहक तुझा गंध
तुच माझी गजल आणि तुच माझा छंद
म्हणतील ही मज कुणी भाव वेडा कवि
संगतीनं तुझ्याच जुळलाय ऋणानुबंध

आठवांच्या ऋतुत प्रीत अशी बहरली
तुच माझी कविता तुच संगीत ठरली
भांबावलोय पुरता तुझ्याच वेडा पायी
तुझ्याच सवे मिलनाची कास मी धरली

वेडा झालोय मी वाटत असेल कुणाला
आठवांच्या गर्दित शोधत असतो तुला
कळतं मला तु येनार नाही वारवांर
उगा समजवत बसतो वेड्या मनाला

          ©शिवा चौधरी
               जामनेर,जळगांव
########################

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें