शनिवार, 12 सितंबर 2015

बाप

💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀
           हैप्पी फादर्स डे
🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷🌼🌷

1999 मध्ये मला सोडुन गेलेल्या माझ्या बाबांसाठी(नाना)....
आणि इतर हयात असलेल्या अन् नसलेल्या बाबांसाठी....

   🌷🌷🌷 बाप 🌷🌷🌷

जन्मा पासुन तुया धावत होता बाप
तुया साठी मायवर बि कावत होता बाप

मारुन तुले शाळंमंदी धाडत जाये बाप
मारलं तुले म्हणुन कोपऱ्यामंदी रडत जाये बाप

अनवानी पायानं फिरत जाये बाप
तुले मातर वह्या पुस्तकं आनत जाये बाप

पिकलं नही रानात तं सावकाराच्या दारि खेटत जाये बाप
कसा बसा संसाराचा गाडा रेटत जाये बाप

मह्या साठी रातंदीस झटले हो बाबा
संसार मह्या पाह्या आधी डोये का? मिटले हो बाबा

आजही मले तुमची समदी शिकवण आठवते
सादी ठोकर जरी लागली तरी डोयात पाणी मातर साठवते.

       शिवा चौधरी
       जामनेर, जळगांव
        कळमसरेकर( BSF)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें