========================
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
========================
साहेब झालं असेल सरकार स्थिर तर इकडे पण लक्ष देता का हो जरा
शहराचं जागतिकीकरण होतंय असं सगळेच म्हणत्यात
मग आमच्या खेड्याचाबी थोडासाक विचार करा
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
आम्ही कुठं म्हटलं शहरात समस्या नाही
पण काही गावामंदी पिण्याचं बि पाणि नाही
सरकारी गोडावून मधलं धान्य घुशी खाताय
अन् आमचे पोरं भुकेनं मरताय
त्या धान्यानतं गरीबाचं पोट भरा
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
आम्ही शेकऱ्यानं लावणी केली शिवारं फुलवलं
पण वादळ अन गारगोंड न नुकसान हो केलं
आता कसं द्यावं शेतकऱ्यानं सावकाराचं देणं
साहेब पुढल्या सालासाठी बिजवाई ची सोयतं करा
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
पंतप्रधान म्हणे लोकायच्या मनातलं अंतर कमी कराले देशोदेशी फिरले
तुम्ही शहरातलं अन् खेड्यातलं अंतर कमी करा
ते विमान फिरले, तुमी गाडीतुनतं फिरा
फुकट नका देऊ काही पण रोजगाराची सोयतं करा
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
विदेशी लोकं भारतात मंदिरं बाधुंन रायले
बिना टॅक्सचा पैसा तेयच्या देशात नेऊन रायले
आमचा पैसा दुसऱ्या देशाच्या कामात येतोय
पण आमच्या मंदीरात मात्र धुळ खात पडतोय
त्या पैशानं का होईना विकासतं करा
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
आज तुमचं उद्या तेयचं सरकार येनार
खेकड्यावाणी एकदुसऱ्याचे पाय कधीलोक वढणार
त्यायनं म्हणे काही तीर नही मारले
प्रत्येकाने आपापली पोटंच भरले
मंग तुम्हीतं एखांदा तीर मारा
मुख्यमंत्री साहेब खेड्यांचा ही उद्धार करा
© शिवा चौधरी(BSF)
जामनेर, जळगांव
========================
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें