शनिवार, 12 सितंबर 2015

लेख (पडद्या मागची सत्यता)

## पडद्या मागची सत्यता  ##

        आम्ही काल ही अज्ञान होतो आजही अज्ञान आहोत आणि जर पडद्या मागची सत्यता पडताळून नाही पाहीली तर उद्याही अज्ञानच राहु यात तिळमात्रही संशय नाही.
मित्रांनो आपण कुठलं ही काम करतांना त्याकडे विशेष लक्ष देत नसतो हे कसं झालं? का झालं? वगैरे
पण तर्क करणे गरजेचे असते ते आपण करतच नाही करतो पण निरर्थक जागेवर
जसे आपण एखादा चित्रपट बघतो आणि नंतर त्यावर विश्लेषण करतो. अरे तु बघितलं का पिक्चर मध्ये नटाने फाईट नंतर मारली पण व्हिलन अगोदरच दूर उडाला मग दुसरा एखादा म्हणतो अरे त्यांना तो शॉट मॅच करता नाही आला.
पण प्रत्येक शॉट मॅच करताच येईल असा परफेक्ट  डायरेक्टर मिळणे कठिणच आणि त्या मुळे कळतं आपल्याला( Something went wrong) कुठेतरी चुक झालीयं आणि जितका हुशार डायरेक्टर तितक्या चुका शोधन्या कठिण मग एखाद्यानं जर चुक लक्षात आणुण दिली तर मात्र पटकन कळते. पण चुका तर होनारच कारण ते चित्रिकरण असतं आणि जास्तित जास्त एका वर्षात पुर्ण केलंल असतं.
असाच एक चित्रपट किंवा धारावाहीक म्हणा हवं तर ते म्हणजे आपलं जीवन आणि या चित्रपटाला दिग्दर्शित करनारे असंख्य डायरेक्टर (दिग्दर्शक) उर्फ धर्माचे ठेकेदार मग कोणताही धर्म असो ठेकेदार तर आहेतच आणि ते आपलं काम अगदी सुचारु पणे पार पाडत आहेत निर्माता तर कधी ढवळाढवळ करतच नसतो.
जे काय करायचयं ते दिग्दर्शकाने आणि तो जसं सांगतो तसंच आपण करतो पण कधीही तर्क करत नाही कि असं का ? तसं का ?
तुम्हाला 3 तासाच्या चित्रिकरणात तर्क करता येतो मग वास्तविक जीवनात तो का करावासा वाटत नाही का कुणास ठाऊक?
काल अचानक वादळ आलं आणि घरावरची छपरं उडवुन घेऊन गेलं तर लोकांन मध्ये चर्चा सुरु होईल अरे हे सर्व देवाची लिला आहे चला मानलं आहे त्याची लिला कारण जे काही घडतं ते त्याच्या मर्जिने घडतं मगं अपघात झाला तर इनक्वायरी आयोगाची गरज का भासते अती पाऊसामुळे धरणं भरतात एखादं फुटतं ही तिथे का इनक्वायरी आयोग? कुणाचं कामं कुठे चुकलं ही शोधाशोध सुरु होते. असो तो विषय घेउन आपण भटकु नये मूल मुद्यावर येऊया तर आपण जीवन पटा बद्दल बोलत होतो. त्यात आपल्याला अनेक प्रकारच्या भित्या घालुन आपल्या लक्षापासुन भटकवलं जातयं पडद्या मागची सत्यता लपवली जातेय आणि ते काम करणारे डायरेक्टर पारंगत आहेत चुका कमी करणारे आहेत. पण चुका तर आहेत नाहीत असे नाही मगं त्या चुका निदर्शनास कुणी आणुन दिल्यातर त्यावर त्यांचा तोडगा ठरलेला आहे ती देवाची लिला होती आणि हे संभाषण खोटं असेल तर करुन पहा एखादा तर्क महाभारत अथवा रामायणा विषयी लिला हेच उत्तर मिळेल. परवा माझ्या मित्राने फेसबुक वर एक पोस्ट टाकली कि दगडाची गाय दुध देऊ शकत नाही दगडाचा सिंह आपल्याला इजा पोहचवु शकत नाही तर दगडाचा देव आपलं भलं कसं करेल त्या साठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल तर त्याला इतक्या निगेटिव कमेंट आल्या विचारूच नका.
तु हिंदू नाहीच
तु हींदुच्या नावावर कलंक आहे ईत्यादी
पण खरं कोणी मान्य केलंच नाही मी विचार केला याच्या बाजुने जर एखाद्याने चुकून कमेंट टाकली तर ?
त्याही व्यक्तिवर शिव्यांचा असा काही वर्षाव होईल सांगता येत नाही.
हजारो वर्षापुर्वीच्या काव्यांवर आमचा विस्वास आहे, पण वर्तमान काळावर नाही 300 वर्षापुर्वी च्या खऱ्या इतिहासाला विद्रुप करणाऱ्यांना आपली साथ आहे.
म्हणुन स्वतःचे दुकान चालवन्या साठि ते आटापिटा करतात आणि आपण होरपडलो जातोय याचं भान न ठेवता आपण त्यांच्या आहारी जातोय. जातिय दंगली निर्माण करुण हे ठेकेदार मजा मारतात. आणि आपण धर्माच्या नावावर जाळफोड सुरु करतो आणि याच जाळफोडीवर हे लोकं त्यांच्या भाकरी शेकत असतात हे आपल्याला कधीच दिसत नाही , किंबहुना आपण बघण्याचा प्रयत्न ही करत नाही पण या दंगलीत मारले गेलेल्या कुटुंबांना एकदा भेट द्या आणि त्यांचे हाल पहा तेव्हा कळेल सत्यता, आपल्याला सहजा सहजी या गोष्टी मान्य करायला वेळ लागेल कारण आपल्या जन्मापासुन आपल्यावर तसं बिंबवलं गेलयं त्यामुळे थोडा वेळ लागणे सहाजिकच आहे,
मी खुप मोठा लेखक आहे असं काही नाही पण जे सत्य बघायला मिळतं त्याचं वर्णन करतो, आणि या बदल्यात चार पैसे ही मिळत नाही किंवा कुठला स्वार्थ ही नाही, मग आपल्याला कधी कळणार ही पडद्या मागची सत्यता. या साठिच का फुल्यांनी आपल्याला शिक्षण दिलं होतं ? यासाठीच का महाराजांनी अठरा बगड जातिंना एकत्र केलं होतं ? पण काय उपयोग ज्याचा जमिर मेलाय त्याला समजावुन असो सृष्टिकर्त्याने तुम्हाला दोन कान दिले आहे एकानी घ्यायचं दुसऱ्यानी सोडायचं पण एक मेंदुही दिलाय ना त्याचा वापर करुन चांगल्या गोष्टी आपल्या जवळ ठेवायच्या मग उरलेला कचरा दुसऱ्या कानाने बाहेर सोडायचं, डोळ्यांचा योग्य वापर करा, कदाचित तुमची दृष्टि भ्रमित करुन तुम्हाला 3 डि चित्रपट तर दाखवला जात नाहीये हे तपासा फुले, शाहु, आंबेडकरांचे अनुयायी बना शिवरायांचा आदर्श डोळ्या समोर ठेवा.
आणि पुन्हा एकदा सांगणं ईतकच कि पडद्या मागची सत्यता पडताळुन स्वतः निर्णय घ्या !

शिवा चौधरी(कळमसरेकर)
        जामनेर,जळगांव
🔌📌🔌📌🔌📌🔌📌🔌📌

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें