शनिवार, 12 सितंबर 2015

कवि काय असतो

कवि काय असतो
हे कधि मला कळलेच नाही

प्रकाशनासाठी छापखान्याकडे पाय माझे कधी वळलेच नाही

कविता लिहल्या जपुन ठेवल्या

पण जगासमोर आणायची हिम्मत कधी झालीच नाही

प्रकाशनासाठी छापखान्याकडे पाय माझे कधी वळलेच नाही

आई बापा साठि लिहली बहीणी साठी लिहली

भावासाठी लिहायला कधी सुचलंच नाही

प्रकाशनासाठी छापखान्याकडे पाय माझे कधी वळलेच नाही
               
             शिवा चौधरी.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें