•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
£ परिवर्तन €
नाव भगवंत पण सर्वांसाठी तो भगुच आम्ही दोघं एकाच शाळेत शिकलो. लहान भगुला तर्क संगत गोष्टी करायची सवय अन् एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करुन सत्य शोधुन काढायची सवय आणि लोकांना समजवण्याचा निरर्थक प्रयत्न करणारा आणि थोडा खोडकर स्वभावी त्यामुळे तो कुणाला फारसा आवडत नसे, बाबांची परीस्थिती नाजुक म्हणुन शिकायला मामा कडे आला होता, वडीलांना वाटायचं याने खुप शिकावे म्हणुन ते त्याला नेहमी प्रेरणा द्यायला म्हणुन कधी कधी भेटुन जायचे आजही ते येऊन गेले होते, कारण होतं त्याचा वाढदिवस त्या निमित्त आज पै पै जोडुन त्यांनी एक छान सा बनियान घेऊन दिला होता, आणि चुलत भावांचे जुनी कपडे वापरणारा भगु आज खुप खुष होता. तेच घालुन तो आज जादुचा खेळ पाहायला गेला होता, जादुचे खेळ करणारे ऐंशी नव्वद च्या दशकात बरेच दिसायचे आज ही मिळतात पण टि व्ही वर शो म्हणुन आणि मनोरंजन म्हणुन पण पुर्वी हेच खेळ काही लोक उदरनिर्वाहा साठी करायचे. खेळ सुरु झाला जादुगर हात चलाखी करुन खेळ दाखवु लागला, हा खेळ तो खेळ करत करत जादुगाराने एक कापडाची चिंधी सर्वांसमोर जाळली आणि म्हणाला आता तीच चिंधी मी पुन्हा तुम्हाला परत आणुन दाखवणार म्हणुन सर्वांनाच कुतूहल होतं कि खरचं चिंधी परत येईल का? अन् आनली तर हा जादुगार खुप मोठा आहे असं आपण समजायचं. आणि त्या काळि या गोष्टींच नवल वाटणं सहाजिक होतं आणि ते ही एखाद्या खेड्यात. जादुगाराने इकडे तिकडे हातवारे केले अन् आपल्या झोळीतुन एक नारळ बाहेर काढला अन जमावातीलच एकाला नारळ फोडायला दिला, काय आश्चर्य नारळ फुटताच जळालेली चिंधी जशीच्या तशी नारळात मिळाली सगळी कडे टाळ्यांचा कडकडाट झाला, फक्त भगुच एकटा शांत बसला होता, ते पाहुन जादुगराला नवल वाटलं म्हणुन त्यानं भगुला विचारलं बाळ तुला नाही दिसली का जादु ?
भगु, नाही काका तुम्ही परत दाखवणार का एकदा ही जादु
जादुगराला वाटले मुलाची जिज्ञासा आहे म्हणुन त्याने त्याची विनंती मान्य केली. पण भगु आता त्यांच्या समोर एक अट ठेवली होती त्या अटी नुसार चिंधी आता भगु जाळणार होता. लहान मुलाला जाळता येनार नाही म्हणुन जादुगाराने शेकोटी पेटवुन त्यात चिंधी टाकुन जाळायला सांगितली चिंधी आता भगु च्या हातात होती, जमाव कुतुहलाने पहात होता पण भगुने क्षणाचा ही विलंब न लावता स्वतःचा बनियन काढुन अग्नीच्या स्वाधिन केला, बनियन ची राख होताच भगु म्हणाला काका आता माझा बनियन द्या काढुन तुमच्या नारळातुन, काका द्याना हो माझ्या बाबांनी खुप काटकसरीने घेतला होता हो माझ्या साठी आना ना हो काका प्लिज ! भगु विनवणी च्या स्वरात म्हणाला, सगळे शांत आणि आवक होउन पहात होते जादुगर ही काही वेळापुरता स्तब्ध झाला.
मग भगुच पुढे म्हणाला काका माझं बनियन परत येनार नाही हे मला अगोदरच माहीत होतं कारण तुमच्या नारळात चिंध्या अगोरच भरल्या होत्या हे मला कळलं होतं म्हणुन मी तेव्हा टाळ्या वाजवत नव्हतो. पण तेव्हा या गावकऱ्यांनी आणि तुम्ही माझं ऐकलं नसतं म्हणुन हा खटाटोप केला माझे बाबा पुन्हा नविन बनियान देनार नाही हे माहीत असुनही तो मी जाळला कदाचित यांची अंधश्रद्धा या सोबत जळाली असेल.
इतक्या लहान वयात आपल्या तर्क शक्तिने आपलं पितळ उघड पाडणाऱ्या बाळाला जादुगराने जवळ घेतलं आणि विचारलं बाळ तुझ्या सारख्या चिमुकल्यांच पोट भरण्या साठी हा खेळ करावा लागतो जर असं नाही केलं तर कसं पोट भरावं तुच सांग ?
भगु, काका खेळ करुन किती दिवस पोट भरणार? आणि या मेहनत मजुरी करणारा कडुन आठ आणे रुपया पाच रुपये घेऊन तुम्ही त्यांच्या मुलांचं पोटं कापुन स्वतःच्या मुलांचं पोट भरताय ते किती योग्य आहे तुम्हीच ठरवा, या पेक्षा मेहनत करुन पोट भरा मुलांना शिकवा, कारण समाजात हळु हळु परिवर्तन होतं जाईल पैसे मिळणे कमी होईल आणि मुलांवर उपासमार येईल म्हणुन आताच जागे व्हा. थोडे जास्त कष्ट करावे लागतील खरं पण ते केव्हा ही चांगलं त्या बालबोधाने जादुगराने खरचं परिवर्तनाचा बोध घेऊन जगायचं ठरवलं. आणि तेव्हाचा खेळ संपला.
पण आज इतक्या वर्षाने मला भगु पुन्हा भेटला अगदी तसाच लोकांना प्रबोधन करतांना मला तो लहानपणीचा प्रसंग आठवला त्या विषयी बोलायला सुरवात केली भगु म्हणाला शिवा समाजात परिवर्तन झालंय आणि होतंय खरं पण त्या काळचे जादुगर अज्ञानी लोकांकडुन खेळाच्या नावावर पैसे घेउन उदर निर्वाह करायचे पण आताचे जादुगर सज्ञानांना ही भुलवतायं फरक इतकाच कि जादुगर बदललेत जादुगारांची संख्या वाढली धर्मानुसार रुपं बदलली, पुर्वी काळ्या बाहुल्यांचा धाक दाखवला जाई आज रंगबेरंगी देवादिकांचा दाखवला जातोय, पुर्वी झोळीत नारळ असायचं आज तिचं झोळी मजारीवर चढवली जातेय, तर कुठे ते नारळ चढवलं जातयं मुलांना जोंधळ्याची भाकर पण बाबाला काजु बदाम दिले जाताय स्वतःच्या मुलाचं पोट कापुन दुसऱ्याच्या मुलाचं पोट भरलं जातयं. स्वतः फाटकं घालुन मजारीवर नेटक्या चादरींचा ढिग केला जातोय कारण पोट भरण्याच्या धंद्याचं काळानुसार जागतिकीकरण झालंय. पण हे सत्य आजही माझ्या बहुजन समाजाला कळत नाहीय तो आजही जादुगराच्या भावल्याच्या नादाला लागलाय या पेक्षा दुर्दैव काय असेल.
आणि खिन्न मनाने माझा निरोप घेऊन माझा मित्र भगवंत कुठं तरी निघुन गेला पण मला मात्र एका छानश्या उदारहराणाची आठवण करुन गेला.
धन्यवाद !
© शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर, जळगांव
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें