सोमवार, 7 सितंबर 2015

सखे मला गाऊ दे!

सखे मला गाऊ दे !

सालु नेसुन भरजार आली नटरंगी नार,
हिरव्या हिरव्या शालुची जरीची किनार
पहाताच देह बोली मन् हेलावतं
काळजाचा वेध घेई नजरेचं पातं
नजरेचा बाण असा खोलवर जाऊ दे
रुपाचे गं गोडवे सखे मला गाऊ दे!

केसाची बट तुझी नागिनीचा तोरा
नाक तुझं चाफेकळी रंग गोरा गोरा
रूप तुझं मखमली गोरे गोरे गाल
भुलविती मनाला ओठ लाल लाल
लाल लाल ओठाची लाली मला पाहु दे
रुपाचे गं गोडवे सखे मला गाऊ दे!

ज्वानीची नशा तुझ्या काळजात पेटली
मदनाच्या जोशात धुंदीत नाचली
बघुन तुला जीव माझा होई वर खालि
मना मध्ये प्रेम तुझ्या ओठी का? गाली
हृदयाचा खोलीचा ठाव मला घेऊ दे
रुपाचे गं गोडवे सखे मला गाऊ दे!

                            ©शिवा चौधरी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें