।।। पाऊस ।।।
विठ्ठलाला सांगतो कमरे वरचे हात काढुन।ढगाला लाव
पाडुन पाऊस देवा आता भिजव माझं गांव
पण स्वत:चे हात मात्र खिशात घालुन बसलात
झाडं तोडुन मला फसवलं आज मात्र स्वत: फसलात
कळते मला रे तुमची आर्त हाक अन् वेदना
झाडाच्या मदती शिवाय येऊ कसा तुझ्या गावी तुच सांग ना?
गाढवाचं लगीन लावतो तु मला बोलवायला
नको बाबा मी नाही येनार त्या लग्नात जेवायला
फक्त झाडं लावुन तुम्ही करा स्वतःवरच उपकार
मग न चुकता येऊन भिजवेल तुझं गाव अन् शिवार
पाऊस पाऊस काय ओरडतोय
गणपती पाण्यात ठेऊन पाऊस कधी पडतो का?
निसर्गाच्या किमयेत असा चमत्कार कधी घडतो का?
जाऊ दे ना मी तुला का उगाच सांगतोय
तु मज साठी कधी रे काय केलसं
झाडं तोडुन घरात फर्निचर मात्र बनवलंस
पावसा पावसा धाव रे भिजव माझा गांव रे
किती रे ओरडता
शेतकऱ्यांच्या दैनेसाठी मलाच का रे धारेवर धरता
तुम्ही त्यांच्या साठी वृक्षारोपण करा
मग हक्कानं येऊन मागा मला पाऊस धारा
का रे मानवा काही तरीच करतोय
मला बोलवायला उपास-तापास धरतोय
उपासाने मी काही येनार नाही गड्या
मला तर हव्या वृक्ष लागवडीच्याच पायघड्या
ओरडुन ओरडुन थकले रे सारे लेखक अन् कवि
मी म्हणजे पाऊस हवा असेल तर झाडे तुला लावायलाच हवी
लावायलाच हवी
©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
%%%%%%%%%%%%%%%%%
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें