शनिवार, 12 सितंबर 2015

श्राद्ध

💐 श्राद्ध ! 💐

श्राद्ध आपण का करतो असं जर आपण विचारलं तर प्रत्तेकाच्या तोंडुन ऐकायला मिळतं कि पुर्वजांच्या आत्म्याला शांति मिळावी म्हणुन करतात ती विधि, पण खरच शांति मिळते का तर माझं तरी उत्तर आहे नाही !

त्या संदर्भात एक किस्साबघु.
एकदा मला माझ्या मित्राकडे जेवायला बोलवलं प्रयोजन श्राद्ध तसं एका दुसऱ्या मित्राला पण आमंत्रण होतं पण त्यानी ते टाळलं का टाळलं ते मी चांगल्या प्रकारे समजु शकत होतो, पण मी त्याच्या विचारांच्या अगदी विरोधात मग काय वेळ नव्हता तरी काढला, आणि पोहचलो पण बघतो तर काय  तेथे माझ्या अपेक्षे प्रमाणे काही नव्हतं,
पित्तर , आगारी, घागर , पुजेचं साहीत्य काही काही नाही फक्त सृती म्हणुण ज्याचं श्राद्ध आहे त्याच्या फोटोला अगरबत्ती लावुन दोन फुलं वाहलेली, अगदी त्या फोटो समोर नैवद्य पण नव्हता, आणि दुसरी कडे अंगणात बरिचं मुलं जेवणावर ताव मारतांना दिसली, काही मुलं अजुनही जेवायला येत होती तर काही तृप्ततेचा ढेकर देऊन बाहेर पडत होती, मला बघताच मित्राची बहीण पाण्याचा ग्लास घेऊन हजर झाली, मी सहज विचारलं नेहा हे गं काय ? ति म्हणाली दादा बस तर खरं जेवणं झाल्यावर मग बोलु या . मी निमुट पणे पाणि घेतले आणि मनाशीच तार जोडतं बसलो , मित्राची अन् माझी ओळख तशी फार जुणी नव्हती पण म्हणतात ना विचार जुळले कि मनं आपोआप जुळतात आणि मनं जुळली कि कधी घट्ट मैत्री होते कळत ही नाही,
त्यांच सर्व आवरुन झाल्यावर आम्ही ही जेवण करुण तृप्ततेचा ढेकर दीला व अनासयाने माझ्या तोंडुन उद्गार निघाले देव त्यांच्या आत्म्याला शांति देवो.
अन् मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला, अरे मी तर दररोज पोटभर अन्न खाणारा आणि माझ्या तोंडुन असे उद्गार निघतात तर त्या अनाथ आश्रमातुन आलेल्या मुलांच्या मनाने किती आभार मानले असतील,
मग आवराआवर झाल्यावर आम्ही सर्व जन बसलो आणि गप्पा करु लागलो तेव्हा मला कळलं कि मित्राची आई एक शिक्षक आहे आणि त्या प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे भोज देऊन श्राद्ध करतात कारण त्यांच्या मते आत्मा कधी मरत नाही, आत्मा शरिर बदलत असतो अन् ज्या गरजु मुलांना आज मी जेवण दीलं त्यांच्यात ही कुणाचा तरी आत्मा असेलच ना आणि जर मी आज इतर आत्म्यांना तृप्त केलं तर मला खात्री आहे माझ्या पतीचा आत्मा कुठे ही असो तो तृप्तच असेल. मला ही ते पटलं, मी म्हटलो खरं आहे तुमचं, काही लोकं एखाद्या व्यक्तिला जीवंत पणी काही खायला घालत नाहीत अन्  त्याच्या आगारी वर पाव किलो गावराणी तुप जाळतात, का तर म्हणे त्याचा आत्मा छळेल अरे जो जीवंत असतांना तुम्हाला ब्र शब्द न बोलणारा व्यक्ति मेल्यावर काय तुम्हाला छळणार आहे.
हा सगळा डाव आहे भटांचा स्वतःच पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रथाचं प्रचलन करून ठेवलंय, आणि आपणं त्याच लकिर चे फकिर बनुन बसलोय.
मला प्रश्न पडला कि यांना सुरवातीला अडचणीआल्या असतीलच, तर त्यांच्या म्हणन्या नुसार बऱ्याच लोकांनी सुरवातीला नावे ठेवली, भीति घातलीतर इतकचं काय लवकरच अतृप्त आत्म्याचा कोप तुमच्यावर ओढवेल हे ही सांगितले पण ति बाई जराही डगमगली नाही आणि तेचं केलं जे तीला रुचलं आणि त्याचं तिला फळही मिळालं आज तीची मुलगी डॉक्टर तर मुलगा म्हणजे माझा मित्र आज सॉप्टवेअर इंजिनीयर आहे आणि त्या माऊलीचा तोचं श्राद्धाचा कार्यक्रम निरतंर सुरु आहे.
आज आपल्याला ही गरज आहे ते श्राद्ध, मुंज, सत्यनारायण, नारायण नागबली, गृहशांती या पली कडे विचार करण्याची सुशिक्षित किंवा सुसंस्कृतच नव्हे तर सृजणशिल बणण्याची.
मित्रहो माझं काम तर मी केलं, आता तुमची बारि.....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें