शनिवार, 12 सितंबर 2015

शिव महीमा

शिव-महिमा

चमचम चमकली समशेर जयाची
कशी वर्णावी किर्ती माझ्या शिवबाची
राजे निघाले खानाच्या भेटीला
जीवा महाल संभा कावजी होते हो साथीला
भेटीच्या तयाचं कसं करु गुणगाण
कोथळा खानाचा काढला वाघ नखानं
निघे आतडी अफजल खानाची
सय्यदबंडा धावुन येई मारण्या शिवबाशी
पण जीवाजी महाल रक्षक शिरजोर
छाटुन बंडाचा हात फेकला भुईवर
कृष्णा कुलकर्णी तो वकिल खानाचा
युद्धशास्त्री नियम नसे वकिलासी शस्त्र चालवण्याचा
पण स्वामीभक्ती त्याची उफाळली ऐनवेळी
उचलुन बंडाचे शस्त्र वार केला राज्यांच्या कपाळी
होता जखम भाळी शिवबा बोलतात
ब्राह्मण हत्या अन् वकिल मारणे बसे ना नियमात
पण कृष्णा कुलकर्णी तो ब्राह्मणच हट्टी
पुन:पुन्हा वार करु पाहे शिवबा वरती
समजाउन कृष्णाला नाही काही फायदा झाला
शेवटी राज्यानं वध कृष्णा कुलकर्णीचा केला
संभाजी कावजी मान कापती खानाची
कशी वर्णावी किर्ती माझ्या शिवबाची।।

हादरला पादशहा राजधानीला
मारण्या शिवबाशी धाडे शाहिस्तेखानाला
खानानी पुण्याला मारीयला तळ
राज चिरवती कटारीनं बाडं
राजे घुसले हो खानाच्या डेऱ्याला
परनारीचा सदा त्यांनी आदरच केला
माहीत होतं त्याला शिवबा शिवेना परनारीला
खान लपला मग बायकाच्या आसऱ्याला
सवड पाहुन खानं हात घाली तलवारीला
नजर राखुन वार बघा राजियांनी केला
तुटली तीन बोटं शाहीस्तेखानाची
कशी वर्णावी किर्ती माझ्या शिवबाची।।

निमंत्रण लगनाचे ताना घेऊन आले
राजानं मुखी चिंता पाहु लागले
ताना म्हणती राजं तुम्ही यावं लगनाला
पण चिंता कसली राजं मुखी सांगा हो आम्हाला
येईल रं लगनाला चिंता एकच मनाला
स्वराज्या घेऊ म्हणतो गड कोंढाण्याला
कडाडले ताना आधी लगीन कोंढाण्याचं
मग करु राजं, राजं लगीन रायबाचं
जीव पणी लावुन तानाजी लढले
जिंकता कोंढाणा ध्वज भगवे चढले
बोलले राजं तुम्ही एक गड आज आला
सिंह माझा गेला सिंह माझा गेला
कशी बोलावी कथा तानाच्या लढण्याची
कशी वर्णावी किर्ती माझ्या शिवबाची।।

कथा राजाच्यां वर्णाव्या,वर्णाव्या हो किती
भल्याभल्याशी वाटे, वाटे तयाची हो भीति
अवतरले हो राजे किती करु गुणगाण
लढले स्वराज्यासाठी देऊन पंचप्राण
चमचम चमकली समशेर जयाची
कशी वर्णावी किर्ती माझ्या शिवबाची ।।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें