सोमवार, 7 सितंबर 2015

विद्रोही

📎📎📎📎📎📎📎📎📎

             • विद्रोही •

दोष असे तुझ्या । कर्माचा मानवा ।
फुकाचा कांगावा । कुंडलीत ।।

भाग्य म्हणे तुझं । पाहतो रे भट ।
सांगे खोटं नाटं । हस्तशास्त्र ।।

कष्टी कमवावे । कष्टाचेच खावे ।
जोर बाळगावे । मनगटी ।।

तुजला तु दर्री । घेतली का कधी ।
त्याच्या साठी गादी । मखमली ।।

धर्माचीया नावे । माझ्या मनी भीति ।
घालशी रे किती । ढोंगीबाबा ।।

होईना कल्याण ।धोंड्याशी पुजुनी ।
घ्यावे समजुनी । अभ्यासुन ।।

कष्ट होते तुझे । फळ मात्र त्याला ।
कळसच झाला । थोतांडाचा ।।

पोटा साठि त्यांनी । मांडला बाजार ।
शास्त्र ते हजार । धर्माचीया ।।

ठोकुनीया छाती । विचारतो जाब ।
दाऊ नको रोब । विद्रोह्याला ।।

© शिवा चौधरी(कळमसरेकर)
       जामनेर, जळगांव

📎📎📎📎📎📎📎📎📎

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें