रविवार, 13 सितंबर 2015

दादा

दादा

कवितेत आजवर आई मांडली, बाबा मांडले, मांडली होती ताई
कसा मांडु तुला दादा कधी समजलेच नाही
आज मांडतोय दादा तुला माझ्या शब्दात
चुकलो तर कधी ठेऊ नको रे मनात

लहान पण च्या त्या छोट्या छोट्या खोड्या
आठवतात रे मला ही थोड्या थोड्या
लहान पण तुझ्या सोबत घालवलं छोट्या छोट्या भांडनात
चॉकेलत पासुन पायताणा पर्यंत चा त्याग भरला नाही मनात

आईच्या गैरहजेरीत आई माझ्या साठी झालास
स्वतः राहुन भुकेला मला मायेचा घास भरवलास
बाबांसोबत शेतात ही खपत होता दादा
संसाराचे सुत्र जणु शिकत होता दादा

कळलं होतं का विधात्याला तु शिकतोय संसाराचं सुत्र
म्हणुनच का अवेळी हीरवलं त्यानं आपल्या डोक्यावरलं छत्र
तु तुझ्या स्वप्नांना तिथंच थांबवलं होतं
स्वतः कष्ट करुन मला मात्र शिकवलं होतं

माझ्या साठी तर तुझ्या रुपात बाप अवतरला होता
पण तुच दादा सर्वार्थाने तेव्हा पोरका झाला होता
माझ्या दादासारखा त्यागाचा गुण मला ही मिळु दे
अशा भावाचा त्याग साऱ्या जगालाच कळु दे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें