# रीती ओंजळ #
किती छान होते ते दिवस
नाचायचं, बागडायचं,
संगे त्याच्या झऱ्याकाठी फिरायचं,
कधी ओंजळीत झऱ्याच पाणि घ्यायचं
होताच रीति ओंजळ त्यानं निरागस पणे खळखळुन हसायचं,
मी ओंजळ घट्ट करायची अन् नव्यान पानी भरायचं,
पण पाणि कधी ओंजळीत थांबलचं नाही,
प्रेमाचं गणित मला कधी कळलंच नाही,
तशी आवडायची त्याला मी पण तो कधी माझ्यात गुंतलाच नाही,
कळलं असेल का त्याला प्रेम आहे माझं त्याच्यावर,
म्हणुनच का कधी कधी तो मला चोरुन ही पाही,
अन् याच आशेवर वाटे मला तो एक दिवस माझाच होईल,
वाटलं नव्हतं तो असं अचानक लग्न करुन घेईल,
मी ही लग्न केले माझ्या एकतर्फी प्रेमाला विसरुन ही गेले,
विसरुन भूतकाळ सारा पतीला भरभरुन प्रेम दीले,
पण आज तो मला स्वप्नात भेटला,
पुन्हा तसाच निरागस वाटला,
त्याला अलिंगन द्यायला मी त्याच्या कडे धावली,
पण स्वप्नात ही माझी ओंजळ रितीच राहीली.
शिवा चौधरी , जामनेर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें