दत्तक सून
आज वर्तमान पत्रात
वेगवेगळ्या विषयावर खुप काही वाचायला मिळतं पण त्यावर विचार करायची वेळ कुणालाच नाही. आज आपण अशाच एका विषयावर आपण बोलणार आहोत.
सुरवाती ला तुम्हाला थोडं मुर्खासारखं वाटेल पण जसजस पुढे वाचाल तेव्हा वास्तविकतेचा आभास होईल, प्रत्येक बाबतीत असं असेलच असं नाही पण 80 टक्के लोकांच्या घरात असे प्रकार दिसुन येतात आणि आमची पिढी ते मानायला ही तयार नसते. याला काही ठिकाणी सासु सासरे ही जबाबदार आहेत तर काही ठिकाणी सुना व मुलं ही गरज प्रत्येकालाच आहे ते तारतम्य बसवुन घेण्याचे, एक तर्फी प्रयत्न करुन आज पर्यंत काही उपयोग झाला ही नाही अन् होणार ही नाही.
गोष्ट तशी 2-3 वर्षा अगोदरची आहे, माझी बदली त्यावेळेस बंगाल च्या नदिया जिल्ह्यात होती, बंगाल मध्ये बऱ्याच जिल्ह्यांची नावे वेगळे आहेत आणि जिल्हा मुख्यालय कुठल्या तरी एका नगरात आहे. तस नदिया जिल्ह्याचं मुख्यालय कृष्णानगर आहे. (जसे महाराष्ट्रात रायगड जिल्हा ज्याचे मुख्यालय अलीबाग येथे आहे. )तर मी कृष्णानगर पासुन 60 किमी अंतरावरील एका खेड्यात वास्तव्याला होतो तिथे चार वर्षापासुन रहात असल्या मुळे बंगाली भाषा अवगत झालीच होती आणि त्यातल्या त्यात मी मराठी भाषिक व सुरवातीला मोडकी तोडकी बंगाली बोलायचो त्या मुळे तिथल्या लोकांचे माझ्यावर स्नेह, अगोदर मी तोडकी मोडकी बोलायचो म्हणुन माझ्या समवयीन स्त्रीयाचं मला जास्त घेरुन असायच्या आणि सुरु व्हायची हास्य मैफिल यातुनच मग मी बऱ्यापैकी बंगाली शिकलो आणि एका कुटुंबाशी माझे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले.
कुटुंब तसं सदन 2 मुली 2 मुलं पति पत्नि आणि एक काडीमोड घेतलेली आत्या
एक मुलगा अन् एक मुलीचं 2 वर्षाच्या अतंरावर लग्न झालं होतं तर दुसऱ्या दोघांच शिक्षण सुरू होतं आणि ते दोघं माझ्याकडुन पोलिसबलात भरती होण्यासाठी शिकवणी घेत होती त्यामुळे रोजच त्यांच्या घरी जाणे होतं असे. आणि सुन बाईला तर ते मुली सारखं जपायचे आणि त्या बदल्यात सुनही त्यांच्यावर आईबाबा प्रमाणेच स्नेह करायची मला ही तीड दादा म्हणुन संबोधत होती त्यामुळे मी त्यांच्या घरातील जणु एक सदस्यच झालो होतो, कधी कधी तर आत्या मला म्हणतं होती बाबु जर तुझं लग्न झालं नसतं तर मी दादाला सांगुन तुला जावाईच करुन घेतला असता (बंगाल मधे मोठ्या भावाला दादाच म्हणतात आपल्या प्रमाणे विशेषणं सहसा तिथे वापरत नाहीत) रोजच काही ना काही गंमतशीर प्रसंग तिथे होतच असायचे.
पण एक दिवसी त्यांची मुलगी नवऱ्यासहीत येवुन टेकली तेही रडत बोबंलतच , मला आश्चर्य वाटलं नेहमी आपल्या खेळकर स्वभावानं सर्वानां हसवणारी ही मुलगी आज ईतका आतंक का करतेय, आणि सोबत आलेला नवरा तर मुग गिळुन बसला होता कुणीच काही बोलत नव्हतं. मी त्यांच्या काही घरघुती भांडनं असतील असा वेध घेउन तिथुन काढता पाय घेतला. पण घरी येवुन मनं स्वस्थ बसेना म्हणुन या विषयावर श्रीमतिशी चर्चा करायला लागलो, मग तीचं म्हणाली अहो विचारायचं तरी होतं नेमकं झालं तरी काय ? आता असु द्या पण उद्या रविवार तुम्हाला ही थोडा वेळ जास्त असेल आणि मी ही लवकर आवरते आपणच जाऊ त्यांच्या कडे.
पण आम्हाला स्वतःहून जावेच लागले नाही तर सकाळी सकाळीच मला त्यांच्या कडुन बोलावणं आलं,
मग मी आणि श्रीमति दोघंही आवर सावर करुन तीथे पोहचलो सोबत माझी मुलं ही होती मग मुलांना माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वाधिन करुन मी सरळ विषयालाच हात घातला.
तिथं त्या मुलीचे सासु सासरे ही आले होते. कदाचित त्यांच्या सांगण्यावरुनच मला बोलावणं आलं होत. मी दोघं पक्षांच बोलणं ऐकलं, मुलीच्या सासुच्या म्हणन्या नुसार त्यांचा मुलगा लग्न झाल्यापासुन त्यांचा राहीलाच नव्हता हीनेच काही तरी जादु करुन आमचा मुलगा हीरावुन घेतला,
हा आम्हाला पुर्ण पगार दाखवत नाही, तीला सारख्या नवनवीन वस्तु आणतं असतो, असे अनेक आरोप प्रत्यारोप झाले व शेवटी ते म्हणाले आता तुम्हीच सांगा का हीच्या साठिच का ह्याला मोठा केला होता. मला अगोदर हसायला आलं पण हसु शकलो नाही मग मी सर्व बाबींचा विचार करुन त्यांना प्रश्न केला तुमचे सासु सासरे आहेत का?
उत्तर आलं हो
कुठं असतातं ?
त्यांच्या मुली कडे
का ?
कारण सासु खट्याळ आहे म्हणुन.
मी म्हणालो मुलगी?
ते म्हणाले नाही ईच्छातर खुप होती एक मुलगी असावी पण नाही होती नशीबात,
आम्ही एक मुलगी दत्तक घेनार होतो पण त्या वेळीनवरा बायकोत एक मत नसल्याने नाही घेतली.
मी सहज म्हटलं आता एक मत आहे का ?
ते म्हणाले हो,
मी म्हटलं आता मुलगी दत्तक घेता का ?
त्या दाम्पत्यानं क्षणाचा ही विलंब न लावता होकार दिला मला आश्चर्याचा धक्काच बसला हे लोकं आज ही मुली साठी इतके उताविळ का ?
मग मीच प्रश्न केला, का हो तुम्हाला मुलगी का हवी?
त्या वेळी श्रीमतिसुद्धा हादरली .
कारण काय तर म्हणे हा भाऊ असा मगं म्हातारपणात आम्ही रहायचं कुठं,
म्हणुन त्यांना मुलगी हवी होती.
मग मी म्हणालो
चला दिली तुम्हाला मुलगी दत्तक पुढे तीचं शिक्षण, पालन पोषण, लग्न कसं कराल आता तर तुम्ही मुलावरचं अवलंबुन आहात मग काय करणार हे कर्तव्य त्याचं आहे ते त्यानं ठरवावं पण मुलगी दत्तक तुम्ही घेतायनां
पण ती त्याची बहीण असेल ना !
तो कसं ही करो आम्हाला फक्त मुलीनं प्रेम द्यायला हवं, आणि त्याचा बहिणीवर जास्त खर्च झाला तर ?
होऊ दे आम्हाला फक्त मुलगी मिळाली म्हणजे झालं.
मी म्हटलं झालं तर मग उद्याच एक मुलीला घेऊन तुमच्या कडे येतो पण तुम्ही तीला काही बोलायचं नाही ती तुमच्यावर आई बाबा सारखं प्रेम करेलं फक्त तिला पोटच्या मुली सारखं जपा म्हणजे झालं.
मुलीच्या हव्यासापायी म्हणा, कि म्हातारपणात सहारा मिळेलं म्हणुन म्हणा, ते दाम्पत्याने मुलाचे व सुनेचे पुन्हा एक ही गाऱ्हाणं न करताच निघुन गेलं.
मग मी काही गोष्टी त्या नवदाम्पत्याला ही सांगितल्या नव्हे समजवल्या, जीथे मला ते चुकल्या सारखे वाटत होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन त्या वृद्ध दाम्पत्याच्या घरी एक मुलगी वजा सुन पोहचवुन आलो आणि नरोबाची तर लाडकी बायको ती अगोदर पासुन होतीच, कदाचित माझ्या बोलण्यातला भाव त्या दाम्पत्याने समजला होता. म्हणुन त्यांनी आमचं उत्साहात स्वागत केलं आणि मी दत्तक दीलेली सून ही स्विकारली नव्हे मुलगीच स्विकारली.
आता बघायचं हे आहे कि आपण किती भावार्थ समजता ?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें