शुक्रवार, 11 सितंबर 2015

आयटम गित

अन् घंट्याचा नाद तुला कसा लागला

नाही शाळा तुला नाही, मंदिराची गोडी
नको झबले पोलके, आणि नको साडी चोळी
यौवनाचा शंख तुझा कसा वाजला
अन् घंट्याचा नाद तुला कसा लागला

लटक मटक चालतांना डोल तुझा छान
डाळींबाचे ओठ तुझे मोरावाणी मान
बघुन तुला काळजाचा ठोका चुकला
अन् घंट्याचा नाद तुला कसा लागला

शब्द तुझे भासता गं विण्याचे बोलं
नजेराचा बाण तुझा रुते खोल खोलं
लांब लांब केसांचा जुडा बांधला
अन् घंट्याचा नाद तुला कसा लागला

चवळीवाणी देह पोरी खळी तुझ्या गालाला
पैंजनाचा ध्वनी तुझा वेड लावी मनाला
नाचतांना तबल्याचा ठेका धरला
अन् घंट्याचा नाद तुला कसा लागला

अवघड हा घाट तुझा मदनाचा थाट
काकडीची काया तुझी भेंडीवाणी बोटं
ज्वानीच्या गं विंचवाने डंख मारला
अन् घंट्याचा नाद तुला कसा लागला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें