शनिवार, 12 सितंबर 2015

वाढदिवस 'ती' चा


भाव माझे शब्द तुझे.....

आज माझा वाढदिवस

पण सख्या तुझी सोबत नाही

तुझ्या साठी आले राया

सोडुन माझे बाबा अन् आई

तुझ्या कामाचा व्याप तर वर्ष भरच राहणार

365 दिवसातुन सांग तु माझ्यासाठी सुटी कधी काढणार

सुटी घेऊन येतोस वर्षातुन एक दोनदा तु घरी

तेव्हा ही कामाचा व्यापचं असे तुझं वरी

काल मला म्हणाला वाढदिवसाचं प्रेझेंट काय हवं

प्रेझेंट नको मला तु फक्त आज मज सोबत रहावं

पण ते तु कधी करु शकलाच नाही

कर्तव्यचं श्रेष्ठ ठरलं आमच्या परी तुझ्या ठाई

पुढच्या वर्षी नक्की येईल म्हणतो

पण ते ही वर्ष निघुन जातं

पण त्यागाचं ही सैनिकांच राजकारणच होतं

माय भुमीस या धर्माच्या ठेकेदाराचां धोका

बलीदानाचं सैनिकांच राजकारण करु नका

राजकारण करु नका

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें