सोमवार, 7 सितंबर 2015

शेतकरी


              शेतकरी

भेंडी नाचे कांद्याचा भाव वाढल्यावर
थांबली जेव्हा व्हिस्कीचा भाव पाहील्यावर
मद्य दर वाढीवर ओरडलात का कधी
कांदा कसा सळतो मग तुझ्या डोळ्यामंधी

चवळी अन् पालक मग पेट्रोलशी भिडली
तीथंही मग पेट्रोलनं मुसंडी मारली
मेथी म्हणे सगळा षंढ झाला समाज
महागाईनं भाज्यांच्या ओरडे बारीमास

मीरची म्हणे माझे भाव जेव्हा वाढतात
खालि वर लोकं दोन्ही कडे जळतात
वांगी म्हणे मीरची ताई करु नको चिंता
रडतील हे कधीतरी तुझ्याही करता

दोडका भोपळा लसुन बघता दुरुन
मोबाईल टि व्ही फ्रिज पुरलेत उरुन
महागाई का फक्त भाजीपाल्यात असते
बाकि बाबतीत बुद्धि गहान का रहाते

आमचा भाव वाढता शेतकरी हसेल
तेव्हाच बळीला चांगला दिवस दिसेल
ग्वार म्हणे दलालाला तुच बाबा चांगला
आज आमचा शेतकरी वेशीला टांगला

               ©शिवा चौधरी
                       जामनेर,जळगांव
***********************************

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें