शनिवार, 12 सितंबर 2015

लावणी(मी या गावाची लाडाची मैना)

लावणी

या गावची...त्या गावची...या गावची त्या गावची,
पावणं माणसं तुमी बारा गावची,
एका जागी लोकं तुमी राहीना.....
मी या गावाची लाडाची मैना
मी या गावाची लाडाची मैना

कोरस:- ही या गावाची लाडाची मैना
            ही या गावाची लाडाची मैना

अहो भर जत्रं मंधी पावणं धरलाय हात
लय खोडकर हो खोडकर, पुरुषाची जात
पावणं रस्त्यामंधी, नका हो अडवुन धरु
पाखरं माज्या मागं, लागलीया भिरभिरु
पण जीव माझा...तुमच्या वाचुन काही राहीना...
मी या गावाची लाडाची मैना
मी या गावाची लाडाची मैना

कोरस:- ही या गावाची लाडाची मैना
            ही या गावाची लाडाची मैना

अहो तुमच्या साठी पावणं घातलाय घाट
या हो बैठकीला... मी तुमचीच बघतीया वात
पावणं खिडकी मधुन कशाला बघताय वाकुन
तुमचा ठेवलाय हो ठेवलाय विडा मी झाकुन
तुमच्या पिरती बगर...विड्याला रंग काही येईना...
मी या गावाची लाडाची मैना
मी या गावाची लाडाची मैना

कोरस:- ही या गावाची लाडाची मैना
            ही या गावाची लाडाची मैना

आज तुमच्या मुळं...झालीया दौलत ज्यादा
नका विसरु हो ...विसरु तुमचा वादा
माझ्या डोक्याला हो...डोक्याला झालाय ताप
आपल्या लगनाला.... विरोध करतोय बाप
तुमच्या पिरमापायी या जिवाची झालीया दैना....
मी या गावाची लाडाची मैना
मी या गावाची लाडाची मैना

कोरस:- ही या गावाची लाडाची मैना
            ही या गावाची लाडाची मैना

अहो पावणं तुम्ही करा हो हींमत थोडी
मला लागली हो...लागलीया तुमची गोडी
इतक्या लोकांमधी...तुमास्नी आज मी हेरलं
माज्या गळ्यामंधी बांधाल का पावणं डोरलं
तुमच्या नकाराची,तुमच्या होकाराची...वात मी पहात हाय ना.....
मी या गावाची लाडाची मैना
मी या गावाची लाडाची मैना

कोरस:- ही या गावाची लाडाची मैना
            ही या गावाची लाडाची मैना

या गावची...त्या गावची...या गावची त्या गावची,
पावणं माणसं तुमी बारा गावची,
एका जागी लोकं तुमी राहीना.....
मी या गावाची लाडाची मैना
मी या गावाची लाडाची मैना

कोरस:- ही या गावाची लाडाची मैना
            ही या गावाची लाडाची मैना

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें