शनिवार, 12 सितंबर 2015

2.लेख वाढदिवसाचे

// पर्यावरण आणि ताईचा वाढदिवस //

मित्रांनो आज काल मोठं मोठी बॅनर लावुन वाढदिवस साजरे केले जातात, शुभेच्छा संदेश दिले जातात उद्देश काय तर फक्त फलकावर झळकायचं आणि मोठे पणाचा आव आणायचा पण त्या निमीत्त कुठलाही उपक्रम कुणी करतांना आढळत नाही.
आम्ही सामान्य माणसंच काही तरी करु शकतो असं एके दिवशीमनात आलं आणि काही तरी वेगळया पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करायचा असं बऱ्याच दिवसापासुन मनात होतं पण करायचं काय जे मानव जिवणासाठी ही आवश्यक असेलं मग ठरवलं आपण आपल्या वाढदिवसाला किमान एक झाड लावायचं त्या प्रमाने घरातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक असा उपक्रम सुरु करायचा, आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लावायचा पण मनात आलं तेव्हा मुलांचे वाढदिवस निघुन गेले होते सौ. चा व माझा पुढे येनार होता लेख ही अगोदर टाकु शकत नव्हतो कारण टिकाकारांनी विचारले असतं तुम्ही लावलं का एखाद झाड मग खोटं बोललं गेलं नसतं, आणि बोललं जरी असतं तर स्वतःला तर लाज वाटलीच असती ना म्हणुन वाट पहात होतो वाढदिवस जवळ येण्याची आणि त्यातच काल सकाळी भाच्याने व्हॉटस् अप् वर मॅसेज दिला मामा आज आईचा वाढदिवस आहे तीचं अभिनंदन करा.
मग मी कल्पना केलेला वाढदिवस साजरा करायचं लक्षात आलं आणि "कल करे सो आज कर, आज करे सो अब पल मे प्रलय होगा बहुरी करेगा कब" म्हणुन ताईला एक शुभेच्छा संदेश दिला अन् केक च्या बदल्यात  एक झाड लावायला सांगितलं आणि वाढदिवसाची भेट म्हणुन मी या विषयावर एक लेख लिहुन पर्यावरण वाढिस मदती साठी तो लेख सार्वजनिक करुन इतरांना ही प्रेरीत करील, तीने तीच काम केलं तीने एक झाड लावलं आणि मी ही लेख लिहुन माझं काम केलं आता उरलंय ते आपलं सर्वांच काम, मित्रांनो भयानक गर्मी, अवेळी पाऊस, दुष्काळ, याला जबाबदार कोन आपणचं ना मग या साठी प्रयत्न ही आपल्यालाच करायला हवे का नको ,
नको ते उद्योग आपण करतचं असतो मग हे ही करुन बघा नक्किच आनंद मिळेल आपल्या वयानुसार आणि खिसा परवाणगी देत असेलं तर मौज ही करा पण त्या बरोबर एक झाड़ नक्कि लावा कारण तुम्ही लावलेलं ते एक झाड, फक्त एक झाड नसुन ऑक्सिजन वाचुन मरणारा साठि जिवनदान असेल नियमित पावसाळा सुरु झाला तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्या साठी वरदान असेल पक्षांची शाळा  पुन्हा भरेल , सगळि कडे हीरवी रानं दिसतील,
कल्पना करा तुम्ही जरी एक झाड लावलं आणि एका माणसाला प्रेरणा दीली तर आज भारताची लोकसंख्या 100 करोड पेक्षा जास्त आहे जर 10 % लोकांनी जरी हे काम केलं तर दर वर्षी 10 करोड वृक्ष या वसुंधरेचा काया पालट नक्कि करणार आणि फक्त वृक्ष लावु नका तर त्याचं संगोपण हि करा आणि आपण केलेल्या कामाचा मोबदला ते झाडं उद्या कोणत्या न कोणत्या रुपात नक्कि देतील आम्ही सुरवात केली आपण ही करा.

मित्रांनो पटलं असेल तर हा उपक्रम साजरा करा व त्याचे फोटो अपलोड़ करुन मला टॅग करायला विसरु नका किंवा खालील व्हॉटस् अप नंबर वर पाठवा कारण तुम्ही टॅग केलेला फोटो ईतरांना प्रेरणा देईल आणि या वसुंधरेला आपण चीर काळ सुजलाम् सुफलाम् पाहू शकु.

शिवा चौधरी, जामनेर
        सीमा सुरक्षा बल
           (कळमसरेकर)
2.

🌳🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳
"पर्यावरण आणि वाढदिवस"

मी असं ऐकलं होतं कि मोठंमोठ्या गोष्टीबोलण्या पेक्षा छोट्या छोट्या गोष्टी समजणं महान कार्य आहे अशीच एक दिसायला छोटी किंवा काही जणांना मुर्खता वाटणारी बाब मी तुमच्या समोर मांडतोय कृपया थोडा वेळ नक्की द्या प्लिज्.
काही दिवसापुर्वी मी एक प्रकल्प सुरु केला होता

"पर्यावरण आणि ताईचा वाढदिवस"(या नावाने)

त्या प्रकल्पाला सोशल साईटवर माझ्या मित्रांकडुन आणि परस्पर मित्रांकडुन त्या दिवशी खुप छान प्रतिसाद मिळाला होता.
त्या प्रकल्पाला यशस्वि रित्या पुढे नेत मी माझा वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा केला मला असं वाटतं प्रत्येकाने यावर विचार करावा. कारण भविष्यात या मुळे एक प्रकारे आपण शेतकऱ्याची, स्वतःची, आणि पर्यावरणाची मदतच करु कारण आज केलेल्या कार्याचे फळ आम्हाला उशीरा मिळेल पण मिळेल मात्र नक्की ज्यांना खरचं मनापासुन वसुंधरे बद्दल आत्मियता असेल त्यांनी या प्रकल्पात सहभाग घ्यावा आणि पुढे या प्रकल्पाला वाढवुन या वसुंधरेच्या ऋणातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करुया आम्ही हा प्रकल्प सुरु करुन 4 महीने उलटले त्यात आम्ही आमच्या परीवारात 5 वृक्ष लावले वर्षभरात त्याची संख्या 50 च्या वर जाईल मग असंच जर प्रत्येक परीवाराने आपापल्या परीवारात भाऊ, बहीण ,मामा-भाचे पति पत्नी मुलं बाळं त्यांची मुलं बाळं यांच्या वाढदिवसाला जर असा दृढ निशचय करुन झाडं लावलं तर आज ही संख्या 50 नंतर 500 आणि कीती तरी पटीनं वाढु शकते आणि हे शक्य आहे ते फक्त क्रिया करुनच अन्यथा आपनाला पावसाला साकळंच घालावं लागेल, पक्षांचा चिवचिवाट सि डी कॅसेट वर ऐकावा लागेल, गाडी उन्हातच पार्क करावी लागेल आणि त्यातल्या त्यात मोटार् सायकल असेल तर आपली काय दशा होईल उन्हात लावलेल्या गाडीवर बसतांना कल्पना करा,
आपण हा प्रकल्प कुठे ही राबवु शकता. शाळा, कॉलेज, नदीकाठी, शेतावर बागेत, रस्त्याच्या दुतर्फा अगदी कुठं ही, हो आपल्याला त्यांना जगवायसाठी जर पावसाळ्यात लावायचे नियोजन असेल तर ज्यांचा वाढदिवस उन्हाळ्यात आहे त्यांनी थोडं उशीरा आणि ज्यांचा हिवाळ्यात आहे त्यांनी थोडं लवकर हा प्रकल्प राबवला तर झाडे जोपासण्यस निसर्ग ही आपली मदत करेल.

जर आपण आज पर्यावरणाची मदत केली तर उद्या पर्यावरण आपली मदत करेल यात शंका नाही.
   चला तर मग एक वृक्ष आपलं ओझं निरंतर वाहणाऱ्या धरणी मातेसाठी लावुया.

आपला - शिवा चौधरी
कळमसरेकर, जळगाव
🌳💐🌳💐🌳💐🌳💐🌳

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें