नवकवी बद्दल प्रेरणादायी काही थोडं......
माझी भाची आम्ही तिला माईच म्हणतो,
काय छान शब्द आहे ना माई, माय आणि आई चं सुरेख कॉम्बिनेशन .
म = माझी ाई = आई,
गावात वाढलो म्हणुन माय,
चार पुस्तकं शिकलो म्हणुन आई
गावात राहुन चार पुस्तकं शिकलो म्हणुन माई
अशा किती तरी व्याख्या आपण करु शकतो.
पण आज मी तिच्या पहील्या कविते बद्दल सांगतोय, माझ्या कवितांना भरभरून दाद देणाऱ्या माईला मी म्हटलं लिहं जमेल तुला, असे तर विचार प्रत्येकाकडे असतात पण त्या विचारांना कमी शब्दात गहण अर्थ सांगत शब्दबद्ध करतो तो कवी अशीच एक कविता आज माईनं केली.
ती ही चक्क मामासाठी
ते पाहुन मला गहीवरुन आलं.
आणि इथं काही सापडु शकतं असं जाणवलं, आणि म्हणुन तिच्या लेखनाला उत्साह मिळावा यासाठी हा छोटासा प्रयत्न.
माईच्या लेखनीतून......
कविता
कविता करायची होती,
पण शब्दांना शब्दांची जोड भेटतं नव्हती,
मनात विचारांचे वादळ होते,
पण वहीवर उतरवायची भाषा सुचत नव्हती,
अशातच एक आशेचा किरण दिसला,
त्यात शब्दांना शब्दाची जोड मिळाली,
विचारांना भाषा मिळाली,
आणि लिहायला सुरवात मिळाली,
तो आशेचा किरण शिवा.....
मला लिखाणास प्रवृत्त करणाऱ्या माझ्या मामास पहिली कविता....
धनश्री पाटील
------------------------------------------------
माझ्या तर्फे माई सह अनेक अशा नवकवीं साठी स्तुती सुमनांचा वर्षाव
शिवा चौधरी
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें