🔫🔫🔫🔫🔫🔫🔫🔫🔫
निर्भय
स्त्रीचं आयुष्य काही नराधमांनी पुर्ण वेली सारखं करुन ठेवलंय, जर तुला पुढं जायचं असेल तर घे एखाद्याचा सहारा, अटकवं त्यात आधाराचे स्प्रिंग मगच सुर्या कडे जाशिल, नाही तर रहा जमिनीवर पडुन अन् पावला पावला वर परत मुळं रोव जमीनित,
का कुणास ठाऊक तुझी मूळ कुणी कापुन तर जानार नाही ना?
आणि नेली कापुन तरी जग वेदनामय आयुष्य त्या वेली सारखं कुठल्यातरी उपमुळाच्या सहाऱ्यानं किंवा जा फरफटत एखाद्या औता मागे तुला तर किंमतच नाही ना.
पण का ? एखाद्या उंच वृक्षा प्रमाणे तिला ही आयुष्यात आकाशाकडे सुर्यप्रकाशाकडे झेप घ्यावीशी वाटते. पण काही सामाजिक चालीरिती हे करु नको ते करु नको. लोक काय म्हणतील,
समाज जगु देनार नाही,
हे काय मुलीनं शिकायची गोष्ट आहे वगैरे वगैरे, कधी होनार स्त्री निर्भय? कधी जगणार स्वतःच स्वबळावर ? मुठभर स्त्रीया जगायला लागल्या ही हिमतीनं तर काय समाजातल्या नराधमांना त्या वेसण घालु शकतील ? निश्चितच नाही.
त्या साठी प्रत्येकीलाच प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकीला एक शिवबा जन्माला घालावा लागेल, प्रत्येकीला कंबरकसावी लागेल, एखाद्या स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराच्या लढ्यात सहभाग घ्यावा लागेल. आज तुम्ही कुणाची मदत कराल तर उद्या संपुर्ण कायनात तुमच्या मदतीला धावेल. पश्चिमी देशात स्त्रीयांच परीधानातच जागतिकीकरण झालं नाही तर विचारांच ही झालंय, बळाचं ही झालंय, मग आपल्या देशात का होऊ नये.
का फक्त कापडं घाल्यापुरतेच पश्चिमी विचार घ्यायचं ठरवलंय आपण ?
बरेच प्रश्न आहेत पण अजुन अनुत्तरीतच, जर हे असंच चालत राहीलं तर समाजात निर्भयांची संख्या वाढतच जाईल, मग ती निर्भय राहीली तरी कुठं ?
उठ तु हो रणरांगिणी
घे तलवार हातात,
फुंक रणशिंग, कस कंबर लढण्यासाठी, नाहीतर हे जग तुला ओरबडुन खाईल .
मग तु कशाला म्हणवशील निर्भया.
तुझी पार अलका ताई करुन सोडतील गं हे नराधम ज्यांना स्त्री फक्त भोग वस्तु वाटते. आणि हे पुरातन काळापासुन चाललयं ते तुला बदलावंच लागेल नाहीतर बस चुल अन् मुल सांभाळत.
म्हणुन सांगतोय निर्भय हो निर्भय 📢
©शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
📢📢📢📢📢📢📢📢📢
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें