🚩बहुजनांनो आता तरी जागा रे🚩
बहुजनांनो आता तरी जागा रे
जिजाऊंच्या वाघावानी निर्भयतेनं जगा रे,
आज गरज आहे बहुजनांना जागण्याची,
अन्याया विरुद्ध खंबीरतेनं लढण्याची,
पेटु नका, उठु नका, घेऊ नका दांडके हाती
थोडासा वेळ काढा आपला खरा इतिहास वाचण्यासाठी,
मुठभर लोकं ती पण काहीही लिहतात,
आपल्या आई बहिनींचे बाजार भाव लावतात,
तरी तुमचं रक्त थंड कसं पडलयं रे,
बहुजनांनो आता तरी जागा रे,
शिवरायांच्या मावळ्यावानी निर्भयतेनं जगा रे,
असे किती दिवस आपण गुरांनवानी जगनार,
स्वतःचा दोर दुसऱ्याच्या हाती देणार,
तेव्हा तीच मुठभर मानसं आपल्याला कसाया समोर नेणार,
म्हणुन म्हणतो पुन्हा एकदा शिवराज्याची कास धरा रे,
बहुजनांसाठी लढणारांना वेळीच मदत करा रे,
बहुजनांनो आता तरी जागा रे,
संभाजींच्याछाव्यांवानी निर्भयतेनं जगा रे .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें