********* अज्ञान *********
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अहो आज मानसाला अज्ञानानं पछाडला,
पावसासाठी देवाला साकळं घालु लागला,
दिवसा ढवळ्या जंगलाची कत्तल करु लागला,
आणि पाऊस नाही म्हणुन देवाला दोष देऊ लागला
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अरे झाडे लावा झाडे जगवा
पाणि अडवा पाणि जिरवा,
यासाठी तुकोबांसारखी मंडळी झटली,
पण तुम्हाला मात्र उपोषणाची संकल्पना पटली,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अहो मानसानं सकारात्मक विचार त्यागला,
मुलं होईना म्हणुन बुवाबाजीच्या नादाला लागला,
स्वतःला मुलबाळ व्हावं म्हणुन वेडा पिसा झाला,
दुसऱ्याच्या मुलाचा नरबळी द्यायला निघाला,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अरे अज्ञानापायी दुसऱ्याच मुल आज मारशिल,
उद्या कुणी तुझं मारलं तर काय करशिल,
अरे अज्ञानी तो मुर्खपणाचे सल्ले देतो,
शिकलेला तु अक्कल कुठे गहाण ठेवतो,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अरे धर्माच्या नावानं दंगली घडवतात,
कुणाचे मुलं अनाथ कुणाच्या बायका विधवा होतात,
तु अज्ञानी म्हणुन तुझं रक्त सळसळतं,
ते बेणं मात्र एसीत बसुन डोकं चालवतं,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अरे मानवता हा धर्म जगात सर्वात मोठा,
धर्माच्या दंगलीत फक्त तुझाच होई तोटा,
हक्क तुझा मागण्या रणांगणात उतर खरा,
पण तलवारी परी तिथे लेखणीचा प्रहार बरा,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अहो मुलगा हवा म्हणुन गंडे दोरे बांधतात,
कधी गर्भपात करुन चिमुकलीचा जीव घेतात,
अरे तीच पोर इवल्याश्या हातानं तुझा घाम पुसते,
तरी तुला ती का नकोशी वाटते,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
स्वतःला ज्ञानी समजणारे
ज्ञानी कधी नसतात,
नको त्या ठिकाणी अक्कल पाजळत बसतात,
अरे अज्ञानाच्या भोवऱ्यातुन बाहेर कधी पडणार,
शिकल्या सवरल्याचा फायदा कधी घेणार,
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
अबब बब पछाडला गं
©शिवा चौधरी(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें