💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🍀🌼आई -बाबा🌼🍀
आई म्हणजे राऊळ, बाबा म्हणजे कळस
आई म्हणजे छप्पर, बाबा छप्परातला पळस
आई म्हणजे सनई, बाबा म्हणजे चौघडा
आई म्हणजे दुधावरची साय, बाबा लोण्याचा गोळा
आई म्हणजे वळचन, बाबा म्हणजे आढ़े
आई म्हणजे उखाणा, बाबा गणिताचे कोडे
आई म्हणजे भाकर, बाबा म्हणजे धान्याची रास
आई म्हणजे वर्तमान, बाबाला भविष्याची कास
आई म्हणजे कविता, बाबा म्हणजे शिर्षक
आई म्हणजे प्रवास, बाबा मार्गदर्शक
आई म्हणजे पाणि, बाबा म्हणजे घागर
आई म्हणजे नदि, बाबा महासागर
आई म्हणजे रंग, बाबा म्हणजे चित्र
आई म्हणजे मोगरा, बाबा सुगंधी इत्र
आई म्हणजे बर्फि, बाबा म्हणजे रवा
आई म्हणजे दुध, बाबा स्वादिष्ट खवा
आई शिवाय बाबा अपुर्ण, बाबा शिवाय आई
तुम्हा विन आयुष्याची माझ्या, गोळा बेरीज शक्य नाही.
शिवा चौधरी
जामनेर, जळगांव
💐🌼🍀💐🌼🍀💐🌼🍀💐
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें