सोमवार, 7 सितंबर 2015

आज नटले मी

आज नटले मी

सख्या तुज साठी आज नटले मी
अंतरीच्या कोपऱ्यातुन आज पेटले मी

वेड्या मनाला सांग आवर कसा घालु
बेधुंद होऊन सख्या आज नटले मी

मोह तुझा आवरेना वेड्या मनाला
स्वप्नातही प्रियतमा तुलाच भेटले मी

नेत्रातुन आसवाचां वाहत झरा होता
मनातल्या भावनांचा बांध फोडला मी

माझ्या मनातील वेदना सांगु मी कुणाला
मनात आठवांचे व्दंव्द झेलते  मी

का रे छळतो उगा माझ्या मनाला
समजवू कशा तुला माझ्या भावना मी

रेगांळते मन् माझे तुझ्याच भोवताली
फक्त तुझ्या गुणांवर आज भाळले मी

तुच माझा जीव तुच माझा प्राण
तुझ्या प्रेमासाठी सदा आसुसले मी

मनात ही माझ्या काहुर पेटलेले
तुझ्यासाठी राया घर सोडले मी

तरी ही तु न भेटसी जरी मला रे
तुज साठी मग हे विश्व सोडते मी

भोवताली माझ्या वणवा पेटलेला
अपयश येता आज काया जाळते मी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें