® बाबा चला ना हो थोडं ©
बाबा चला ना हो थोडं पावसात निघा,
हरवलेलं बालपण माझ्या खेळा मध्ये बघा ,
चिंब चिंब भिजुन मज्जा करा थोडी,
पाण्यामध्ये सोडा जरा कागदाची होडी,
होडी जेव्हा पाण्यामध्ये
पुढे पुढे निघेल,
गंमत बघता बघता तुमची
मी ही थोडा भिजेल,
सोबत तुमची असतांना ओरडेल का हो आई,
चिखलामध्ये पाय घसरुन
पडण्याची भीति सुद्धा नाही,
आई मला पावसात भिजु द्यायची नाही,
बाबा तुझे रागवणार अशी सदा ताकिद देत राही,
सोबत तुमची असल्यावर
मी ही हिम्मत करेल जरा,
मला ही शिकु द्या हो
थोडी जगण्याची तऱ्हा.
शिवा चौधरी जामनेर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें