कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
चला गं सयांनो, चला चला.....(गद्य)
मीनु ये गं, टिनु ये गं, ये ग पुर्वा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
डोहाळे पुरवा , हीचे डोहाळे पुरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
कोरस....
लाजली गं पोर अशी गालात हसली
ममतेची चाहुल हिच्या मनाला लागली
या गं या सयांनो हिला सजवु चला
फुलांचा गं साज सारा फुलांचा झुला
हिरव्या हिरव्या शालुवर चुडा हीरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
डोहाळे पुरवा , हीचे डोहाळे पुरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
कोरस....
पंच पक्वानाने ताट मी भरते
बघुन का गं बाई नाक मुरडते
नको बर्फि पेढा नको श्रीखंड तुला
कैरी हवी कि चिंचा बोरं सांग गं मला
आंबटाचा घास तिला आता भरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
डोहाळे पुरवा , हीचे डोहाळे पुरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
कोरस....
जमल्या गं आया बाया तुझ्या अंगणी
चांदोबाच्या झुल्याला गं फुलं चांदणी
कन्या हवी कि पुत्र तुच सांग गं मला
रुपं त्याचं कुणावानी दिसावं तुला
चांदोबाचा झुला आज हीला झुलवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
डोहाळे पुरवा , हीचे डोहाळे पुरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
कोरस....
डोहाळे पुरवा , हीचे डोहाळे पुरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
डोहाळे पुरवा , हीचे डोहाळे पुरवा
कुणी तरी हीचे डोहाळे पुरवा
कोरस....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें