दादा
दादा माझ्या दादा
खेळ रे खेळुया
पुन्हा आठवुया
बालपण माझे
बालपण असं
झरकन गेलं
स्वावलंबी केलं
शिकवुन मला
तुच दिला माझ्या
जिवनाशी अर्थ
मज साठी सार्थ
तुच असे दादा
अगे बाळगुन
तुझे रे आचार
तुझेच विचार
भिनु दे नसात
तुच माझा बाबा
तुच माझी आऊ
तुच श्रेष्ठ भाऊ
जिवनात माझ्या
©शिवा चौधरी(प्रहार)
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें