शनिवार, 12 सितंबर 2015

ईमानदारी चे प्रकार

========================
$#  ईमानदारांचे प्रकार  #$

        गोष्ट तशी वीस एक वर्षा पुर्वीची असेल मी नुकताच वडिलांच्या सांगण्या वरुन वाचनाला सुरवात केली होती. त्यावेळी बाल बुद्धि नेमकं काय वाचायला हवं जेणे करुन आपला फायदा होईल तसं फारसं कळतं नव्हतं म्हणुन नवनवीन चित्रपटा बद्दल बालगीत हाय राणि सारखे कॉलम वाचायचो आणि हे वाचता वाचता केव्हा वाचनाचा छंद जडला कळलंच नाही मगं सुरु केलं कादंबरि वाचन, लेख, कविता आणि खुप काही वाचता वाचताच लिखाणाची ही आवड निर्माण झाली. सुरवातीला चारोळ्या, कविता लिहल्या नंतर एखादी मनानेच तयार केलेली गोष्ट मग ते कसं ही असो पण लिहलं असो मला तरी वाटतं कसं ही असो प्रत्येकाने लिहायला पाहीजे कारण काही गोष्टी आपल्या मनात असल्या तरी आपण बोलु शकत नाही, कुणाला वाटेल काही तरीच सांगतोय पण हे सत्य आहे. तुम्हीच बघा पुर्वी एखादा प्रियकर प्रेयसीला पत्र लिहायचा आजही मॅसेज च्या रुपात प्रपोज करतांना आढळतो, कुणी मनातलं बोलु शकत नाही म्हणुन पत्राव्दारे बोलतांना आढळता अगदी आत्महत्या करणारा सुद्धा पत्र मागे सोडतांना दिसतो, असो आपला विषय तो नाही आज तसा मुड नव्हता लिहायचा आणि विषय ही मिळाला नाही म्हणुन लिहायचं टाळुन झोपायचा विचार करुन अंथरुणावर विसावलो. तितक्यात मित्रांची आपसात ईमानदारी या विषयावर चर्चा ऐकायला आली सहज म्हणुन त्यांच्या कडे लक्ष दिलं तर ते खरा ईमानदार कोन या गोष्टी बद्दल त्यांच एक मत होतं नव्हतं पाहुन मला ही प्रश्न पडला खरचं कोन असेल या जगात ईमानदार आणि ते ठरवावं तरी कसं ? मग मला आठवलं कि 20 वर्षापुर्वी एक पुस्तक वाचनात आलं होतं त्याचं नाव नेमकं आठवत नाही कदाचित वात्सायन होतं कि कामसुत्र माहीत नाही पण त्यात लेखकाने पतिव्रतेचे चार प्रकार सांगितले होते मग डोक्यात विचार आला जर त्याच प्रकारे आपण ईमानदारांचे प्रकार ठरवले तर ?
बघा तुम्हाला पटतात का ?

1. असा व्यक्ति जो स्वप्नात ही बेईमानी चा विचार येऊ देत नाही असा ईमानदार पहिल्या क्रमाकांवर असावा.

2.असा व्यक्ति ज्याच्या स्वप्नात बेईमानी चा विचार येतो पण तो स्वप्ना पुरताच मर्यादित असतो वास्तविक जिवनात ती व्यक्ति ईमानदार असते तो नंबर दोन चा ईमानदार असवा.

3. अशी व्यक्ति ज्याला बेईमानी करावीशी वाटते पण तो भित असतो समाजाला ईज्जतीला आणि पकडले जाण्याच्या भितीला असे ईमानदार तीन नंबर च्या श्रेणीत मोडले जाऊ शकतात.

4. हा शेवटचा प्रकार ज्यात बेईमानी करायची तीव्र ईच्छा असुन ही तसं करायला वाव मिळत नाही आणि म्हणुन तो ईमानदार असतो.

असे हे चार प्रकारचे ईमानदार व्यक्ति आपल्याला समाजात बघायला मिळतील, अगदी याच्याशी मिळते जुळते प्रकार आपण इतर बाबतीत ही करु शकतो.
असो आता आपण किंव्वा आपल्या नेते मंडळीने ही आपण कोणत्या प्रकारातले ईमानदार आहोत हे प्रांजळ मताने ठरवावं आणि पहील्या वर्गात आपली गणती व्हावी असं कार्य करावं, आणि स्वप्नांवर आवर घालता येत नाही तर निदान दुसऱ्या प्रकारात तरी बसाच.

© शिवा चौधरी(कळमसरेकर)
       जामनेर, जळगांव

ता.क. - ते अज्ञात लेखक ज्यांनी पतीव्रतेचे प्रकार सांगितले होते त्याच प्रकारांना मिळत्या जुळत्या प्रकारांच वर्णन केल्या बद्दल क्षमस्व !
========================

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें