सोमवार, 7 सितंबर 2015

अडाण्याचा ब्रह्मराक्षस

अडाण्यांचा ब्रम्हराक्षस तो

अडाण्यांचा ब्रम्हराक्षस तो
जाळीन तुझं घर,
शिकुन सवरुन पुढं जाईल
तेच खरं बहुजनाचं पोरं,
अजुन किती दिवस स्वतःला शुद्र म्हणवुन घेनार,
शिक्षणाचे महत्व तुझ्या डोक्यात कधी शिरणार,

विचारांच काहुर त्याच्या डोक्यात माजलं होतं तेव्हा,
आंबेडकर हे नाव जगात डंका वाजवुन गेलं जेव्हा,
शेणा चिखलाचा मार खाऊन सावित्रीबाई कधी डगमगली नाही,
मग बहुजनांच्या पोरीनों तुमालेच शिक्षणाची लाज का गं बाई,

शिकला सवरला तरच होईल तुमची उन्नती,
नाही शिकलात तर झालीच बघा दुर्गती,
हक्क तुझा मागायला तलवार चालवता येईल तेव्हा,
शिक्षण रुपी ढाल घेउन रणांगणात उतराल तेव्हा.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें