रवी - धरा
अवकाशाच्या गाली,
अवतरली लाली.
तुज भेटीस ही,
उष:काल आली.
विखुरली चांदी,
दवाच्या रुपात.
निसर्गानं दान दिलं,
तुझ्या गं सुपात.
आगळेच वस्त्र,
दवबिंदूचे ल्याली.
धरा तुझी काया,
पाचू गत चमकली.
कटीवर पिवळे,
लेवून पितांबर.
तुज सवे आज,
सजले हे अंबर.
इंद्र धनुचा त्यानं,
कमरबंध बांधला.
निळा सारंग शालु,
तुजल गं दिधला.
श्रावण सरीने,
अंग अंग भिजले.
ओढीनं तयाच्या,
तव अंतरंग थिजले.
बहरला रंग,
प्रितीच्या संग.
तु रवीची राधिका,
तो धरेचा श्रीरंग.
कवडशाच्या रुपात,
स्पर्श यौवणाला झाला.
पंचतत्वातूनी मानव,
जन्मास गं आला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें