सोमवार, 2 नवंबर 2015

कॉपी पेस्ट

या कॉपी पेस्ट च्या भानगडीत………

माणसं जोडायला गृप सुरु करुन एडमीन चा गुन्हाच झाला.
अन साहित्य चोरांनी अलिकडे फ़ार सुळसुळाट केला.
अशा वेळी एडमीननं कसे वाचवावे पाय,
या कॉपी पेस्ट च्या भानगडीत करावं काय?

आपलीच पोस्ट आपल्याला दिसते,
पण नाव मात्र तिथं दुसरंच  असते.
आयते श्रेय लाटायला सारेच तयार हाय
या कॉपी पेस्ट च्या भानगडीत………

बरं जनहिताची पोस्ट जशाची तशी येई,
तिथे का त्याला कॉपी पेस्टची गरज भासत नाही,
त्यातल्या ही चुका सुधरवून तर पहाय,
या कॉपी पेस्ट च्या भानगडीत………

वादग्रस्त पोस्ट बनवुन मिरवतो झोक्यात,
चुक नसते काही तरी एडमीन येतो गोत्यात,
सह एडमीनची पण त्यातुन सुटका नाय,
या कॉपी पेस्ट च्या भानगडीत………

जर का? प्रतिभेची कॉपी करता आली असती,
सामान्यांची इथं राव् दुर्गती झाली असती,
मनाची ही लाज त्यांना कशी वाटत नाय,
या कॉपी पेस्ट च्या भानगडीत………

भाग्य बापाचं नाव तरी तेच ठेवाता,
का ? तिथं बी कॉपी पेस्टच करता,
त्यात बी आम्हाला शंकाच वाटती हाय,
या कॉपी पेस्ट च्या भानगडीत………

©शिवा चौधरी(कळमसरेकर)
      जामनेर,जळगांव

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें