बाप
ईतुकासा शब्द "बाप"
महती सरता न सरे
छोट्या मोठ्या दुःखासही
बाप जिद्दीनं मागं सारे
निसर्गाची मार भारी
पडे सल काळजावर
खुल्या लोचणातून पाही
मढं, त्याचं तोच सरणावर
रक्ताळल्या पाऊलांनी
बाप औता मागं फिरे
जरी बेतलं जिवावर
बाप मह्या पुरूनच उरे
जीव पेरला मातीत
पाऊसानं दिला दगा
त्याचं मातीत दिसती
त्याच्या काळजाच्या भेगा
भेगा बुजण्या कुणीही
नाही फिरकला घरी
तरासून बाय मह्या
लटकला आढ्यावरी
बापा तुह्या मांगे मायची
बांधाईन रे चकरी
वासनांध बोकडांच्या
जशी कळपातली बकरी
बापा जीव नको देऊ
लढ प्राण पणाशी लावून
एक दिसं सजलं रे धरा
हिरवं लुगडं लेवून
हिरवं लुगडं लेवून
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें