थ्री इन् वन स्पर्धॆसाठी………
शिवाजी राजे आमचे
निश्चयाचा महामेरू
उगाच नव्हतं श्रेष्ठ
त्या जिजाऊंचं लेकरु
आशा होती मावळ्यांची
स्वराज्य स्थापिती राजे
म्हणून माझ्या राजांचा
तिन्ही लोकी डंका बाजे
यश राजांच्या पदरी
विनोदानं आलं नाही
स्वराज्यासाठी राजांनी
काय काय केलं नाही
माझ्या आऊंचा वारसा
नारी गं तू घेशिल का?
जन्म एका शिवबाला
सोनाली तू देशील का?
मुजरा राजे मुजरा
मुजरा करतो शिवा
माझिया राज्यांची किर्ती
मनी साठवूनी ठेवा
🏽शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें