कथा आणि व्यथा
लाल लाल यस्टी
काय माझा तोरा
सह्याद्रीच्या कुशीत मी
फिरतेय बघा गरागरा
पहिल्यांदा मी तुमच्या साठी
पुणे अहमदनगर धावले होते
बी एस आर टी सी नाव मला
सुरूवातीस त्यांनी लावले होते
सध्या मी यस्टी म्हणून
सगळीकडे प्रचलित आहे
व्यवहार बघून जरा काहींचा
मन मात्र विचलित आहे
खरचटून खरचटून सिटापाठी
रोमियो मुक्याने प्रपोज करताय
जाहिरातीचे पॉम्पलेट काचेवर
रोज नवाच अप्रोच दावताय
प्रवाशांच्या सेवेसाठी.....
ब्रीद जरीमाझं सुंदर छान
प्रवासीच मग मावा खाऊन
आतल्या आतच करताय घाण
बरं इतक्यावर माणसं थांबत नाही
आंदोलन करून करतात घाई
राजकारणाला बळी पडतात
उगाचच मग यस्ट्या जाळतात
हिरकणी आली शिवनेरी आली
तुम्ही तिलाही देताय फाटा
वेळ वाचवण्याच्या नादात
करून घेताय आपलाच तोटा
तुमचीच काठी तुमच्याच पाठी
तुम्हीच करताय माझे हाल
कराल प्रवास जर माझ्या संगे
होईल यस्टी मी मालामाल
शिवा चौधरी
जामनेर,जळगांव
८२७५४९३२२१
MSRTC (ST) यस्टी ला समर्पित.....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें