shivachaudhary.prahar
बुधवार, 9 सितंबर 2020
आत्महत्या, का व कुणासाठी ?
सोमवार, 8 जुलाई 2019
हिंदी अभंग
*_हिंदी अभंग_*
बता दे ईश्वर
बता मेरे अल्ला
कैसे होगा भला
इंसानो का....
कोई पढे वेदं
कोई तो कुराण
फिर भी विराण
बुद्धी लागे.....
किसीं हात झेंडा
किसीं हात दंडा
राजनीती फंडा
जाने ना वो....
पताकों का रंग
यहा निला पिला
देह पर चोला
काके हरा...
चाल चले कोई
कटे मरे कोई
बदनामी भये
पताकों की.....
बता मेरे राम
कैसा यह खेला
विषैली ये बेला
बोये कौन ?.....
*_- वास्तव_*
गुरुवार, 2 अगस्त 2018
हम भारत माँ के सपूत हैं।
हम भारत माँ के सपूत हैं।
जो हाथ बढ़ाएगा, वह मुंह की खायेगा ।
हम भारत वासी को , जो आँख दिखायेगा
कितनी जान है इस दिल मे , उस वक्त दिखलाऊंगा,
तेरी जमीं पर आकर , सबक तुम्हे सिखलाऊंगा
हो चीन तुम पाकिस्तान, हो दहशत गर्दो की जान
हम उन्हें ना बख्शेंगे जो मुल्क हो बेईमान.....
हम उनके लिए यमदूत है , हम भारत माँ के सपूत हैं। || धृ ||
तिरंगे की शान बचाने, खून हमने संजोया है ।
भगतसिंह, सुखदेव , (राज)गुरूसा, वीर यहाँ पर पाया है
इसांनो के कदर के खातिर भले ही आंसू बहते है,
देश की लाज बचाने वाले,गुंडे दिलों में रहते हैं।
जिन हांथो में सजी चूड़ियाँ बंदूके भी वही संभाले है,
नन्हे मुन्हे शेर भी हमारे,तपती आग के गोले है।
इन गोलों से टकराने से समझो तुम्हारी भभूत है,
हम भारत माँ के सपूत हैं।हम भारत माँ के सपूत हैं। - १
हिन्दू मुस्लिम शिख ईसाई, धर्म मिलेंगे अनेक यहाँ,
देश के खातिर मरमिटने वाला जज्बा मिलेगा एक यहां।
निकल पड़े जब जीत के खातिर,पता ना हमको साहिल का...
हड्डियों में भरा है बारूद न डर दिखलाओ मिसाइल का!
समझौतों से समजाया पर अकल तुम्हारी ज़ीरो हैं,
झांक के देखो इतिहास हमारा अब्दुल हमीद यहाँ हीरो है।
नाकाम तुम्हे कर देगी ऎसी पौलादी छाती हम रखते है,
शांति के संदेश दिलाने वाली ख्याति भी हम रखते हैं।
कही गरम तो कही नरमिया ऎसा हमरा वजूद हैं....
हम भारत माँ के सपूत हैं।हम भारत माँ के सपूत हैं। - २
हर हर महादेव की गूंज उठेगी मरहाटों के ओंठो से
उतनी भारी आवाज़ न आ पायेगी तुम्हारी तोफों से
अग्नी पृथ्वी मिसाइलें बना गया हिंदुस्तां का मुसलमां था
भारत देश था प्यारा उनको जितना प्याराउन्हें कलमा था
दक्षिण में है जलपोत हमारे पूरब में गोरखा बैठा है,
सिखों की गर्जना सुन सुन उत्तर में हिमालय ऐंठा है।
हर धरम के हर जाति के शेर यहाँ मौजूद है...
हम भारत माँ के सपूत हैं।हम भारत माँ के सपूत हैं। - ३
प्रार्थना
*प्रार्थना*
दे जिजाऊ मजला दे सावित्री मजला,
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला || धृ ||
ज्ञाना शिवाय येथे, कुठलाच वाव नाही
अज्ञानास या जगती, कसलाच भाव नाही
जे कळले गं मजला, ते कळू दे तू सकला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला……१
जात धर्म पंथा, इथं नसावाच थारा
पेरीत मानवता सांगू एक धर्म सारा
शिकण्यासाठी येथे नसे भेदभाव कसला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला......२
रंजल्या गांजल्याशी आम्ही संगतीस घेऊ
या अखंड देशाला चला रंग एक देऊ
आंबेडकर फुले शाहू, असो ध्यास अमुचा असला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला......३
न नरास देणार ना नारीस देणार
ना तृतीय पंथास उगा त्रास ना देणारं
मना मनात साऱ्यांच्या भाव रुजू दे गं असला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला......४
आई बाबा संगतीनं, मान गुरूंचा ही राखू
सखी सवंगडया संगे,फळ ज्ञानाचे हे चाखू
सांगतो शिवा सकला, जो शिकला तो टिकला
दे बुद्धी दे मजला दे बुद्धी दे सकला……५
रचनाकार/गीतकार
🖊शिवदास चौधरी
(कळमसरेकर)
जामनेर,जळगांव
८२७५४९३२२१
©या प्रार्थनेचे सर्वाधिकार गीतकाराने राखून ठेवले आहेत.आपण आपल्या शाळेत कुठला ही बदल न करता ही प्रार्थना लागू करू शकता हा अधिकार मात्र गीतकार आपणास स्वखुशीने देत आहे.
रविवार, 8 जुलाई 2018
अप्रूप
अप्रूप
शेंडा जाई दिगंतरी
मुळं मातीच्या अंतरी
धरेवीन हर्ष कुणा
नसेल या भुईवरी
किती मातीला अप्रूप
कसं सांगेल ती माती
तिच्या हर्षाचाच पान्हा
देई झाडाला त्या गती.
पान्हा मायेचा पिऊनी
त्याची उंचाविता मान
त्याच्या उंच या झेपेचा
मातीस त्या अभिमान
शिवा सांगीतो अनिला
तुझा धरिला मी धागा
तुझ्या प्रश्नाच्या उत्तरा
दिली कवितेत जागा
तुही झाड आम्हासाठी
आम्ही तुझीच ती माती
सांगू मनाचे अप्रूप
तुझी वाढतांना कीर्ती
शिवा चौधरी
८२७५४९३२२१
मंगलवार, 12 जून 2018
ठुमरी
ठुमरी
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
रातभर चांदण्यांनी बघूनी झुरावे ।।
तुझ्या आठवात शहारते अंग
तुझ्या पिरतीचा चढताच रंग
मन बावरे हे प्रीतीत झुरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुझ्या अंतरीची वाट कुठे शोधू
पिरतीच्या सावजा सांग कसे वेधू
नजरेच्या घावाने हृदय पोखरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुला भेटण्याला आतुरले सारे
मज सवे फुलपाने चंद्र आणि तारे
तुज भेटी अंती गगनी विचरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुझ्या कुंकवाचा रंग लेऊनिया
तुझा अंश माझ्या कुशी घेऊनिया
वाटे मनाला स्वच्छंदी वावरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
शुक्रवार, 8 जून 2018
आपलं गाव आणि आपली माणसं
आपलं गाव आणि आपली माणसं
आपलं गाव आणि आपली माणसं
यांची कर्तबगारी पाहूया,
चला कळमसरे गावाची
आज ओळख करून घेऊया ।।धृ ।।
गावासाठी दादा भाऊ नाना आप्पा
झटलेले मी पाहिले आहे
पौष पौर्णिमेच्या यात्रेत मी
गाव नटलेले हे पहिले आले
जय अंबे जय भवानी जय च्या जयघोषात
बायका माणसं रंगून जातात
यात्रा जरी छोटी आमची
त्यात लहान थोर दंगून जातात
कुस्त्यांची दंगल येथे
न चुकता बघता येईल
आणि खरं जीवन आनंदानं
त्या दोनच दिवसात जगता येईल
हा आनंद उपभोगण्या साठी
एकदा पुन्हा लहान होऊया..... ।। १ । ।
हिंदूंची दिवाळी गावात
मुस्लिम ही साजरी करतो
आणि रमजान चा शिरखुर्मा
हिंदू ही आनंदानं खातो
न्हावी धोबी तेली कुणबी
बारा बलुते येथे वास करतात
अहो गाव गाव राज्य सोडा
इथली माणसं जगाचाही प्रवास करतात
एक दिवस सपूत इथला
मंगळावर ही यान सोडेल
आणि कळमसरे गावचं नाव
गिनीज बुकात ही जोडेल
आपल्या गावाचा लौकिक
साऱ्या जगालाच दावूया.....।। २ ।।
आर्मी, नेव्ही, बी एस एफ , सी आर पी
अहो शिक्षकांचा तर बोलबालाच आहे
शिपाया पासून फौजदारा पर्यंत
आमचा ही खाकी वाला आहे
कुणी वकील कुणी इंजिनियर
कुणी एम पी एस सी चा पल्ला गाठतोय
कुणी पोरांच्या भविष्यासाठी
रात्रंदिवस मातीत झटतोय
मला वाटतं पोरांनी ही
स्वप्न मोठी मोठी पाहायला हवी
आपापसातल्या दुराव्या ला
मूठ माती द्यायला हवी
गावासाठी मिळून सारे
योगदान काही देऊया.....।। ३ ।।
नावाजलेला बोरसे आंबा
मी सुद्धा पहिला नाही
काठोकाठ भरून वाहणाऱ्या सोनदला
आज थेंब सुद्धा राहिला नाही
पाण्यासाठी गाव आपलं
सारं वणवण भटकतय
प्रगतीचं चक्र गावाचं
गड्या कुठं तरी अटकतय
वृक्ष लागवड जल संवर्धणाचा ध्यास
आता आपल्यालाच घ्यावा लागेल
कागदावरच्या योजनांना
कृतीत न्याय द्यावा लागेल
भविष्यातील धोका टाळायला
आताच सजग राहूया.....।। ४ ।।
वारकरी संप्रदायाचा गाव आपला
विज्ञानात ही पुढे जातोय
जवाहर वाचनालयाच्या माध्यमातून
वाचन संस्कृती पुढे नेतोय
कुणी कवी कुणी लेखक
कुणी वेगळीच कला जोपासतोय
कुणी कुणी डॉक्टर होऊन
रुग्णांना ही तपासतोय
छोट्या मोठ्या व्यवसायात ही
पोरं आमची पुढं जाताय
कष्टाचीच कमावताय
आणि कष्टाचीच खाताय
ताठ कणा अन् कणखर बाणा
जपून आपला ठेवूया..... ।। ५ ।।
कवी शिवा एम.चौधरी
कळमसरे ता. पाचोरा
८२७५४९३२२१