ठुमरी
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
रातभर चांदण्यांनी बघूनी झुरावे ।।
तुझ्या आठवात शहारते अंग
तुझ्या पिरतीचा चढताच रंग
मन बावरे हे प्रीतीत झुरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुझ्या अंतरीची वाट कुठे शोधू
पिरतीच्या सावजा सांग कसे वेधू
नजरेच्या घावाने हृदय पोखरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुला भेटण्याला आतुरले सारे
मज सवे फुलपाने चंद्र आणि तारे
तुज भेटी अंती गगनी विचरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुझ्या कुंकवाचा रंग लेऊनिया
तुझा अंश माझ्या कुशी घेऊनिया
वाटे मनाला स्वच्छंदी वावरावे
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे ।
तुझ्यावरी प्रेम मी शतदा करावे खरच हे शब्दच खरे आहेत खूपच छान आहे.आणि तुमचे शौर्या आणि प्रेम मला जाणवले खूपच छान
जवाब देंहटाएं